गळीत हंगाम आधीच सुरू केल्याने रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; राम शिंदे यांचा आरोप

गळीत हंगाम आधीच सुरू केल्याने रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; राम शिंदे यांचा आरोप

बारामती : 15 ऑक्टोबरच्या आधी गळीत हंगाम सुरू केल्यामुळे बारामती अॅग्रो साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे आमदार राम शिंदे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीचा हा साखर कारखाना असल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारकडून या वर्षीचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरला सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो साखर कारखान्यात तीन दिवस आधीच गळीत हंगाम सुरू केल्याची तक्रार भाजपचे आमदार राम शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर साखर आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती.

हेही वाचा – अमृता फडणवीस प्रकरणात फरार आरोपी जयसिंघानीचा २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश

दरम्यान संपूर्ण चौकशी झाल्यानंतर रोहित पवार यांना क्लीनचिट देण्यात आली होती आणि मात्र चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून त्याचे नाव अजय देशमुख असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सहकार विभागाकडे राम शिंदे यांनी पुन्हा तक्रार दाखल केली. त्यामुळे बारामती अॅग्रो साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीचा असलेला बारामती अॅग्रो साखर कारखान्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी केली होती. 15 ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश असतानादेखील कारखाना सुरू केल्याबाबतची तक्रार राम शिंदे यांच्याकडून साखर आयुक्तांकडे करण्यात आली होती. रोहित पवार यांच्या मालकीचा बारामती ॲग्रो साखर कारखाना 10 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू करण्यात आला होता. त्यामुळे या कारखान्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राम शिंदे यांनी केली होती.

हेही वाचा – “येत्या २६ तारखेला कळेल शिवसेना काय आहे”, संजय राऊतांचं चॅलेंज

 

First Published on: March 17, 2023 9:53 PM
Exit mobile version