भाजपचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ, काँग्रेसची आशिष शेलारांवर टीका

भाजपचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ, काँग्रेसची आशिष शेलारांवर टीका

भाजपचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ, काँग्रेसची आशिष शेलारांवर टीका

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव भयंकर वाढला आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. तसेच देशात ऑक्सिजन,रेमडेसिवीर,व्हेंटिलेटर, कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच अदर पुनावाला यांच्या धमकी प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात गदारोळ निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या आहेत. भाजपचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ असल्याचे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. तसेच आशिष शेलारांनी भाजपच्या मुजोरपणाची परंपरा कायम राखली असल्याची टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, भाजपाचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ अशी परिस्थिती आहे. जो यांना आरसा दाखवतो त्याच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली जाते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मनमोहन सिंह व राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या चुका दाखवण्याचा, सल्ला देण्याचा प्रयत्न केला परंतु याला केवळ भाजपा ची मुजोरी, अकार्यक्षमता व अज्ञान जबाबदार असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अदार पुनावाला यांच्या तक्रारीवरून सवाल केला. लसीकरणाबाबत मोदी सरकारच्या नियोजनशून्यतेवर बोट ठेवले. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केंद्राने रेमडेसिवीर व लसींची निर्यात का केली हा प्रश्न उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने हेच प्रश्न विचारले असतानाही भाजप आमदार आशिष शेलार यांनी भाजपा ची मुजोरपणा ची परंपरा कायम राखली. भाजपा हा टवाळखोरांचा पक्ष आहे हे स्पष्ट आहेच. त्यामुळे कालाकांडी वगैरे भाषाही त्यांनाच शोभू जाणे. भाजपा नेत्यांनी कितीही टवाळखोरी केली तरी काँग्रेस जनतेचा आवाज उचलत राहील असे सचिन सावंत यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले होते आशिष शेलार

देशात कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अशा परिस्थितीतही केंद्र सरकार राज्यांना मदत करण्यास दुजाभाव करत असल्याचे महाविकास आघाडीतील काही नेत्यांचे म्हणणे आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. ज्यांचे आयुष्यच काळाकांडी करण्यात गेले असे नाना पटोले काळाबाजाराची माहिती ठेवत असतील. ते कधी व्यवहारातल्या सत्यतेवर चर्चा करत नाहीत. माहिती ठेवत नाहीत. फक्ता उचलली जीभ लावली टाळ्याला असे म्हणत पटोलेंच्या वक्तव्याचा गांभीर्याने विचार करत नाहीत असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

First Published on: May 3, 2021 5:15 PM
Exit mobile version