सदाभाऊ खोतांनी केले केतकी चितळेचे समर्थन, म्हणाले…

सदाभाऊ खोतांनी केले केतकी चितळेचे समर्थन, म्हणाले…

अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर खासदार शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केली होती. यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. महाविकास आघाडीतील पक्षांसह भाजपच्या काही नेत्यांनी तिला समज दिली. मात्र, माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचे समर्थन केले आहे. त्यांनी केतकीचा मला अभिमान आहे, असे म्हटले आहे. केतकी चितळे या प्रकरणानंतर सध्या पोलीस कोठडीत आहे.

केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावे लागेल, न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असे सदाभाऊ खोत म्हणाले. स्वतःवर टीका केली की सगळे आठवते. सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवता का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका करताना तुमची नैतिकता कोठे गेली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर वेगळा शब्द वापरत टीका केली होती. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती. अमोल मिटकरी ब्राम्हण समाजाला टार्गेट करताच त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

प्रस्थापितांनी नेहमी विस्थापितांवर अन्या केला आहे. आम्हाला प्रस्थापितांचा वाडा पाडयचा आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले. यावेळी सरकारने माझ्या जेलवारीची तयारी केली आहे, कालांतराने माझ्यावर गुन्हे दाखल होतील. मात्र, त्याची भीती मला नाही. शकुनी मामांनी सतरंजीवर चाली टाकलेल्या आहेत. जनतेच्या बाजूने बोलल्यानंतर सरकार आवाज दाबते आहे, अशी टीका खोत यांनी केली. सरकार कट कारस्थान करणारे कौरवाची फौज आहे. कंसाचा वध करायला श्रीकृष्ण रुपी देवेंद्र फडणवीस जन्माला आले आहेत. तुमच्या बापांचा बाप देवेंद्र फडणवीस आहेत. सरकार माझी जेलवारी करण्याच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. त्यांनी मला काही फरक पडणार नाही. 20 मे च्या सभेत सरकारचे षडयंत्र उघडे करणार, त्यानंतर ते मला अडकवणार हे नक्की, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

First Published on: May 16, 2022 3:23 PM
Exit mobile version