Kiran Mane: किरण माने वादात संभाजी ब्रिगेडची उडी! ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या सेटवर ठिय्या आंदोलन

Kiran Mane:   किरण माने वादात संभाजी ब्रिगेडची उडी! ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या सेटवर ठिय्या आंदोलन

Kiran Mane: किरण माने वादात संभाजी ब्रिगेडची उडी! 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर ठिय्या आंदोलन

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho )   या मालिकेतून अभिनेते किरण माने (Kiran Mane)   यांना काढून टाकल्यानंतर मुलगी झाली हो ही मालिका वादाच्या भोवऱ्यात आली असून सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. या वादात आता संभाजी ब्रिगेडने (sambhaji brigade)  उडली घेतली आहे. साताऱ्याच्या वाई येथे मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवर जाऊन संभाजी ब्रिगेडने ठिय्या आंदोलन केले आहे. कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. मुलगी झाली हो या मालिकेचे चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला आहे. पॅनोरमा एंटरटेनमेंट या प्रोड्युसर कंपनीच्या डायरेक्टरला जाब विचारण्यासाठी संभाजी ब्रिगडेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

किरण मानेंना मालिकेतून बाहेर काढल्याने मुलगी झाली हो या मालिकेचे शुटींग स्थानिकांकडून याआधीही बंद पाडण्यात आले होते. किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर मालिका बंद होणार असे म्हटले जात होते. सातारा जिल्ह्यातील गुळुंब ग्रामपंचायत हद्दीत सुरु असलेले ‘मुलगी झाली हो’ मालिकेचे शूटिंग गुळुंब ग्रामपंचायतीने थांबवण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात गुळुंब ग्रामपंयतीने मालिकेच्या पॅनोरामा एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसला मालिकचे शूटिंग थांबवण्या संदर्भात एक पत्र देखील लिहिले होते .

किरण माने सतीश राजवाडे आव्हाडांच्या भेटीला 

अभिनेते किरण माने (Kiran Mane)  आणि सतीश राजवाडे (Satish Rajwade)  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांच्या भेटीला गेले आहेत. किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Jhali Ho )  मालिकेतून काढून टाकल्यानंतर निर्माण झालेल्या वादासंदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe)  यांच्या नेतृत्वात किरण माने आणि सतीश राजवाडे यांनी जितेंद्र आव्हाडांची भेट घेतली आहे. किरण माने हे मुलगी झाली हो मालिकेत प्रमुख भूमिकेत होते. तर सतीश राजवाडे हे स्ट्रार प्रवाह वाहिनीचे कंटेंट हेड आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेचा वाद चांगलाच रंगला. अनेक आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आज मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महत्त्वाची बैठक बोलावली. बैठकीत किरण माने, स्टार प्रवाहचे क्रिएटिव्ह हेड सतीश राजवाडे आणि स्वत: खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित आहेत. मागील अनेक दिवस मालिकेवरून सुरू असलेल्या या वादावर या बैठकीतून या वादावर काही तोडगा निघतो का? या वादावर पडदा पडणार का? किंवा किरण माने मुलगी झाली हो या मालिकेत पुन्हा काम करताना दिसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे या बैठकीनंतर किरण माने, सतीश राजवाडे हे काय भूमिका मांडणार हे देखील पाहणे महत्त्वाचे असेल.


हेही वाचा – Kiran mane : ‘मुलगी झाली हो’ मलिकेचं साताऱ्यातील शूटिंग बंद; गुळुंबु ग्रामपंचायतीचा निर्णय

First Published on: January 20, 2022 3:40 PM
Exit mobile version