‘या दिवशी’ संभाजीराजे छत्रपती जाहीर करणार आपली राजकीय भूमिका

‘या दिवशी’ संभाजीराजे छत्रपती जाहीर करणार आपली राजकीय भूमिका

संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ 3 मे रोजी संपला. यानंतर संभाजीराजे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार होते. याबाबत त्यांनी घोषणा केली आहे. संभाजीराजे यांनी आपली भूमिका 12 मे रोजी पुण्यातून स्पष्ट करणार असे जाहीर केले आहे. संभाजीराजे कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार की! स्वतःचे अस्तित्व राज्यात निर्माण करणार हे 12 मे रोजी पुण्यातून स्पष्ट होणार आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमध्ये यावे त्यांचे स्वागत करू, असे जाहीरपाने सांगितले आहे. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाजीराजे यांचे स्वागत करू असे म्हणाले आहेत. पण संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेणार हे येत्या 12 मे रोजी कळणार आहे.

राजकारणात आता उतरायचंय हे आता निश्चित आहे. मग दिल्ली असो किंवा महाराष्ट्र असो, दोन्हीत मी रमतो. दोन्हीकडे माझे संपर्क वाढलेले आहेत. महाराष्ट्र माझ्याकडे शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन दिल्लीत जायला पाहिजे, असे बघतो. तर दिल्लीतल्या लोकांची इच्छा आहे शिवाजी महाराज, शाहूंचा वंशज येथे आला आहे. दिल्लीत त्याची ताकद वाढायला हवी. दोन्ही अँगल आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्हीच्या माध्यमातून मी राजकारणात सक्रिय होणार आहे, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, याबाबत त्यांची भूमिका 12 मे रोजी कळणार आहे.

संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार होते. त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. यापुढची दिशा निश्चित वेगळी असणार यामध्ये काही दुमत नाही. पण पुढची दिशा काय असणार आहे, त्यासाठी वाट पाहूयात. ३ मे नंतर आपण पुन्हा एकदा बोलू, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते.

First Published on: May 6, 2022 11:53 AM
Exit mobile version