इतिहासाचा विपर्यास कराल तर गाठ माझ्याशी, ऐतिहासिक चित्रपटांवरून संभाजीराजे कडाडले

इतिहासाचा विपर्यास कराल तर गाठ माझ्याशी, ऐतिहासिक चित्रपटांवरून संभाजीराजे कडाडले

पुणे – गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र, या चित्रपटांतून शिवरायांचा चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. हर हर महादेव आणि वेडात मराठी वीर दौडले सात या चित्रपटावरून संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – शिवप्रताप गरुडझेपची गर्जना आता ओटीटीवर

संभाजीराजे म्हणाले की, सिनेमॅटिक लिबर्टी सध्या सुरू आहे ते ठीक आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटाला हे चालू शकत नाही. हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास झाला. महा

हेही वाचा – ‘वेडात मराठे वीर दौडले ४०’ चे प्रोड्युसर, दिग्दर्शक एकनाथ शिंदे, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनाच दिला क्लॅप

ऐतिहासिक चित्रपट बनवता ही चांगली गोष्ट. पेंढारकरांनी किती छान चित्रपट बनवले होते. मात्र आता लोकांना आवडतं म्हणून काही चित्रपट बनवायचे का? “वेडात मराठे वीर दौडले सात” काय तो पोशाख हे काय मावळे आहेत का? असा प्रश्न संभाजी राजे यांनी महेश मांजरेकर यांचे पुत्र सत्या मांजरेकर याचा फोटो दाखवून उपस्थित केला. या चित्रपटात कुठल्या दृष्टीने हा मावळा वाटतो, असंही संभाजी यांनी विचारलं.


इतिहासाचा विपर्यास करणारे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे. माझी सूचना आहे की तुम्हाला ऐतिहासिक चित्रपट काढायचे आहे तर त्यासाठी ऐतिहासिक समिती नेमली पाहिजे, असा सल्लाही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

First Published on: November 6, 2022 5:45 PM
Exit mobile version