सगळ्यावर आम्ही बोलायचं, मग तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार का?; देशपांडेंचा मविआवर हल्लाबोल

सगळ्यावर आम्ही बोलायचं, मग तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार का?; देशपांडेंचा मविआवर हल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावरुन महाविकास आघआडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. राज ठाकरे यांच्या भाषणात महागाई, बेरोजगारी यांसारखे मुद्दे नव्हेत अशी टीका मविआच्या नेत्यांनी केली. याला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सगळ्यावर आम्ही बोलायचं मग तुम्ही फक्त प्रॉपर्टी गोळा करणार का? असा बोचरा सवाल देशपांडे यांनी मविआच्या नेत्यांना केला.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. “महागाई वर आम्हीच बोलायचं, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचं, कोरोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता तेंव्हा लोकांच्या समस्या पण राजसाहेबांनीच सोडवायच्या, आणि तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडर मधलं कमिशन खाणार?” अशी खरमरीत टीका देशपांडे यांनी ट्विटद्वारे केली. या ट्विटमध्ये त्यांनी विरप्पन गँग असा हॅशटॅग वापरला आहे.

वाढलेली महागाई, इंधन दरवाढ भोंग्यातून सांगा – आदित्य ठाकरे

राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्यांच्या भूमिकेवरुन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. वाढलेली महागाई, इंधन दरवाढ भोंग्यातून सांगा, असा सणसणीत टोला आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे आणि मनसेला लगावला.

“मला वाटतं यावर जास्त टीपण्णी करण्यापेक्षा भोंग्यातून वाढलेल्या किंमतींबद्दल लोकांना सांगता आलं, तर हे पण सांगावं की ही दरवाढ झाली आहे, पेट्रोल-डिझेल, सीएनजी असेल, हे कशामुळे झालं, हे ,सांगावं, ६० वर्ष पूर्वी न जाता गेल्या दोन-तीन वर्षात का झालं हे सांगावं,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंगा उतरवण्याच्या भूमिकेचा पक्षाला फटका, मनसे नेत्याने सोडला पक्ष


 

First Published on: April 15, 2022 11:53 AM
Exit mobile version