राज ठाकरेंना अटक झाल्यास राज्य सरकारनं तयार राहावे, संदीप देशपांडेंचा सूचक इशारा

राज ठाकरेंना अटक झाल्यास राज्य सरकारनं तयार राहावे, संदीप देशपांडेंचा सूचक इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबादच्या सभेदरम्यान प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी आणि सभेदरम्यान अटींचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५३ अ अंतर्गत राज ठाकरेंवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. परंतु राज ठाकरेंना अटक झाली तर मनसैनिक आक्रमक होतील. आमच्यावर कितीही केसेस पडल्या तरी आम्ही घाबरत नाही अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि महाराष्ट्र सैनिक राज ठाकरेंच्या आदेशांचे पालन करतील. राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांना अटक केल्यास मनसैनिक रस्त्यावर उतरेल असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

राज्य सरकारने जर आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तर सरकारने तयार राहावे. आमच्यावर किती केस पडल्या तरी आम्ही घाबरत नाही. आमच्यावर यापूर्वीच अनेक केसेस आहेत. कायदेशीर लढाई लढू पण साहेबांना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही. तसेच राज ठाकरेंना अटक करण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. राज ठाकरेंवर आता गुन्हा दाखल केला आहे. आता पुढील कारवाई अटकेची असेल असे मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

औरंगाबादमधील सभेत नियम आणि अटींचे उल्लंघन केल्या प्रकरी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंवर कलम 116,117,153 ए,135 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच औरंगाबाद मनसे जिल्हा अध्यक्ष सुमित खांबे यांच्यावरसुद्धा पोलिसांनी कारवाई केली आहे. सभेच्या आयोजकांवरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित खांबे यांच्या घरी पोलिसांचे पथक दाखल झाले होते. त्यांना कारवाईची नोटीस पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या नोटीसीचे स्वागत केल असल्याची प्रतिक्रिया मनसैनिकांनी दिली आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंवर अखेर गुन्हा दाखल, औरंगाबाद सभेवरुन पोलिसांची मोठी कारवाई

First Published on: May 3, 2022 4:15 PM
Exit mobile version