पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंसारखं निर्भीड वागावं ही अपेक्षा, संजय राऊतांचा सल्ला

पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंसारखं निर्भीड वागावं ही अपेक्षा, संजय राऊतांचा सल्ला

संग्रहित छायाचित्र

गोपीनाथ मुंडे म्हणजे राजकारणातलं दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. शिवसेना-भाजपची युती राहावी आणि अखंड टिकावी, हे त्यांचं कायम स्वप्न होतं. अनेकदा चर्चेच्या आणि बैठकीच्या माध्यमातून जाहीरपणे त्यांनी भूमिका मांडली. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंसारखं निर्भीड वागावं ही अपेक्षा, असा सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.

संजय राऊत हे आज बीड दौऱ्यावर आहेत. गोपीनाथ गडावर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची फार गाढ श्रद्धा होती. ठाकरे परिवारासोबत त्यांचे फार जवळचे संबंध होते. शिवसेना-भाजप हे दोन रक्ताचे भाऊ आहेत, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्यानंतर सर्वच नाती तुटली. त्यामुळे ते असते तर कदाचित ती नाती तुटली नसती.

वारसा असला तरी त्यांच्या नेतृत्वाची बरोबरी कुणीही करू शकत नाही. मुंडेंचा वारसा म्हणून पंकजा मुंडेंनी निर्भयपणे पुढे यायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी हे एकच व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांची बरोबरी कुणीही करू शकत नाही. गोपीनाथ मुंडे ज्यापद्धतीने निडरपणे राजकारणात वावरले आणि झुंजले. त्यातून अनेकांना प्रणय मिळाला. त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले. मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी प्रयत्न केल्यामुळे भाजप तुम्हाला थोडाफार कुठेतरी दिसतोय, असं संजय राऊत म्हणाले.

मुंडेंच्या काळातला भाजपा पक्ष जो आम्ही महाराष्ट्र आणि देशातला पाहिला, तो आम्हाला आता दिसत नाहीये. आम्ही केंद्रात अटलबिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांचा भाजपा पक्ष पाहिला. या महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा पक्ष आम्ही पाहिला. त्यामुळे आम्हाला फरक जाणून येतो, असंही राऊत म्हणाले.

नोटबंदीचा कोणताच फायदा झाला नाही  

नोटबंदी अयशस्वी ठरली तर भरचौकात मला फाशी द्या, असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ते म्हणाले की, लोकांनी भरचौकात फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. पंतप्रधानांची इच्छा पूर्ण केली पाहिजे. त्यांच्या निर्णयामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढली. व्यापर, उद्योग आणि लहान उद्योगही बंद पडले. नोटबंदी केल्यानंतर काळापैसा सोडा एक रुपया तरी बाहेर आला का?, अतिरेक्यांना काळ्या पैशांचा पुरवठा होतो. तो देखील बंद होईल. मग काश्मीरला जाऊन बघा नेमकी तिथे काय परिस्थिती आहे, असं म्हणत राऊतांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.


हेही वाचा : ‘अंतिम निकाल येईपर्यंत विद्यमान सरकार घटनाबाह्यच’, ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याचा


 

First Published on: May 20, 2023 4:38 PM
Exit mobile version