ED, CBI, NCB पाठवता आले नसल्यामुळे बदला घेण्यासाठी गुन्हा दाखल, संजय राऊतांचा भाजपवर पलटवार

ED, CBI, NCB पाठवता आले नसल्यामुळे बदला घेण्यासाठी गुन्हा दाखल, संजय राऊतांचा भाजपवर पलटवार

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीतील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत ईडी, सीबीआय, एनसीबी अशा तपास यंत्रणांना पाठीमागे लावू शकले नाही म्हणून बदला घेण्यासाठी थेट गुन्हा दाखल केला असल्याची टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. भाजप नेत्यांविरोधात अपशब्द वापरल्यामुळे दिल्लीत भाजप महिला मोर्चाकडून मानहानीची तक्रार करण्यात आली आहे. मात्र बदल्याच्या भावनेतून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, दिल्लीमधल्या एका पोलीस स्थानकात माझ्या विरोधात तक्रार नाही तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी मधल्या काळात ज्या शब्दाचा वापर केला आहे. तो वापरलेला शब्द भावना दुखवणारा असल्याचे सांगितले आहे. काय भावना दुखवल्या कोणाला मुर्ख बोलणं, अशिक्षशित बोलणं असे शब्द वारंवार आपल्या राजकारणात आणि समाजकारणात वापरत असतो असे राऊत म्हणाले.

त्या अप शब्दाचा अर्थ मूर्ख

मी शब्द वापरला त्याचा अर्थ देशातील नाही तर जगातील कोणत्याही शब्दकोशात मूर्ख, अतिशहाणा, बुद्धू असा आहे. जर अशा शब्दाविरुद्ध गुन्हा दाखल व्हायला लागले. तर या देशात खरोखरच कायद्याचे राज्य राहिले नाही. पण ठिक आहे. माझ्याकडे ईडी, सीबीआय, एनसीबी यांना केंद्र सरकार पाठवू शकलं नाही म्हणून आता अशा प्रकारे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संसदेचे कामकाज सुरु असताना एखाद्या खासदारावर गुन्हा दाखल करण्याचे धा़डस दाखवलं आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी असे कितीही गुन्हे आमच्यावर दाखल केले तरी आम्ही सत्य बोलण्यापासून थांबणार नाही.

गोव्यात युतीबाबत विचार आणि चर्चा सुरु

गोव्यातील काँग्रेस आणि शिवसेनाबाबातच्या युती संदर्भात प्राथमिक चर्चा आहे. माझी काही लोकांशी चर्चा सुरु आहे. पण प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. ज्या राज्यात अशा आघाड्या करायच्या आहेत त्या राज्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करायला लागते. ही प्रकिया मोठी आहे. पंरतु ते तयार झाले नाहीतर आम्ही गोव्यात २२ जागांवर स्वतंत्र लढू असे संजय राऊत म्हणाले.

मोदी पंतप्रधान होतील असे कोणालाही वाटले नव्हतं

कोणी कोणती स्वप्न पाहू नयेत असे नाही. २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असे कोणालाही वाटत नव्हते. राजकारण अतिशय चंचल आहे. या देशातील लोकशाही अतिशय चंचल आहे आणि देशातील जनताही शहाणी आहे. विरोधकांच्या एकजुटीबाबत चर्चा सुरु आहे. या देशात विरोधकांची एकजूटता पर्याय म्हणून बनण्याची गरज आहे. देशातील सर्वोच्च नेत्यांशी चर्चा करताना असे वाटते की, सगळ्यांना सोबत आणून आपले मतभेद काही वेळ दूर करण्याचे काम एकच नेते करु शकतात आणि ते शरद पवार आहेत असे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : संजय राऊतांविरोधात भाजप महिला मोर्चीची मानहानीची तक्रार, दिल्लीत FIR दाखल

First Published on: December 13, 2021 10:36 AM
Exit mobile version