घरताज्या घडामोडीSanjay Raut : संजय राऊतांविरोधात भाजप महिला मोर्चाची मानहानीची तक्रार, दिल्लीत FIR...

Sanjay Raut : संजय राऊतांविरोधात भाजप महिला मोर्चाची मानहानीची तक्रार, दिल्लीत FIR दाखल

Subscribe

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीच्या मंडावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय महामंत्री दीप्ती रावत यांनी महिलांविरोधात अपशब्द वापरल्या प्रकरणी ही तक्रार दाखल केली आहे. दीप्ती रावत भारद्वाज यांनी ९ डिसेंबर रोजी ही तक्रार दाखल केली होती. रविवारी या प्रकरणात एफआयआर दाख करून घेण्या आला आहे. संसदेच्या १२ निलंबित खासदारांच्या आंदोलनाच्या ठिकाणी खूर्ची आणून दिल्याच्या विषयावर विरोधकांनी टीका केल्यावर संजय राऊत यांनी वापरलेल्या भाषेवर आक्षेप घेत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर मानहानी केल्या प्रकरणीची कलम ही एफआयआरमध्ये वापरण्यात आली आहेत. (FIR against sanjay raut at delhi by deepti rawat for abusing language against bjp women party workers)

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?

याआधी ९ डिसेंबर रोजी एका वृत्त वाहिनीवर संजय राऊत यांनी मुलाखत दिली होती. त्यामध्ये १२ निलंबित खासदारांच्या आंदोलनाच्या ठिकाणी संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना खुर्ची आणून दिल्यासाठी विरोधकांनी केलेल्या टिकेबाबतचा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी भाजपच्या मानसिकतेविरोधात अपशब्द वापरला. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही, चु… गिरी बंद करा अशा भाषेत राऊतांनी विरोधकांचा समाचार घेतला होता. याच वक्तव्याची दखल घेत भाजपच्या दीप्ती रावत भारद्वाज यांनी दिल्लीच्या मंडावली पोलीस ठाण्यात ९ डिसेंबरला तक्रार दाखल केली. एफआयआर नुसार कलम ५०० आणि ५०९ न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर मानहानी केल्या प्रकरणीची कलम ही एफआयआरमध्ये वापरण्यात आली आहेत.

Posted by Deepti Rawat Bhardwaj on Friday, December 10, 2021

- Advertisement -

 

पोलिसांना व्हिडिओही सोपावला

संजय राऊत यांनी अपशब्द वापरतानाच महिलांचा अपमान केल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना हा अपशब्द वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलाखतीच्या प्रक्षेपित झालेला व्हिडिओही तक्रारीच्या वेळी पोलिसांना सुपुर्द करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांपैकी महिलांना उद्देशून अपशब्द वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Posted by Deepti Rawat Bhardwaj on Friday, December 10, 2021

 


मोदींना ‘नेमकचि बोलणें’ फोड करून सांगू; संजय राऊत यांचा टोला

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -