संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावं हीच अपेक्षा, संजय राऊतांची प्रतिक्रिया

संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावं हीच अपेक्षा, संजय राऊतांची प्रतिक्रिया

राज्यसभेच्या ६ जागांवरील निवडणुकीवरुन (rajyasabha election) राज्यातील राजकारण तापलं आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje) यांना शिवसेनेचा उमेदवार होण्याची ऑफर शिवसेनेकडून देण्यात आली होती. परंतु त्यांनी नकार दिला आहे. यामुळे आता शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेचे उमेदवार व्हावं अशी शिवसेनेची भूमिका होती. त्यांना राजकीय पक्षाचे वावडं नाही असे संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे. तसेच राजेंच्या समर्थकांनी मागील १५ दिवसांचा घटनाक्रम पाहिला पाहिजे असा सल्लासुद्धा संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना डावलून संजय पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे राजेंच्या समर्थकांनी रोष व्यक्त केला आहे. यावर राऊत म्हणाले की, माझा यामध्ये व्यक्तिगत काय संबंध आहे. शिवसेनेचा काहीही संबंध नाही. जे अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. त्यांनी मागील १५ दिवसांपासूनच्या घटना समजून घेतल्या पाहिजेत. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा आम्ही संभाजीराजे छत्रपती यांना द्यायलाय तयार आहोत. तो छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी आणि घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेना काय करु शकते हे त्यांनी सांगावे. ४२ मतांचा कोटा निवडणुकीसाठी लागतो, ही ४२ मतं आम्ही संभाजीराजे छत्रपती यांना देण्यासाठी तयार होतो. परंतु आमची भूमिका होती अट नाही तर भूमिका इतकीच होती की, आपण शिवसेनेचे उमेदवार व्हा, छत्रपती किंवा त्यांच्या कुटुंबाला राजकीय पक्षाचे वावडं असण्याचे कारण नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

संभाजीराजेंच्या समर्थकांचा दावा चुकीचा

यापूर्वी स्वतः थोरले शाहू महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेसकडूनही त्यांनी निवडणूक लढवली आहे. मालोजीराजे भोसले यांनीसुद्धा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढली ते आमदार होते. स्वतः संभाजीराजे छत्रपती हेसुद्धा राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षात छत्रपतींच्या घराण्यातील कोणी जात नाही हा जो त्यांच्या समर्थकांचा दावा आहे तो चुकीचा आहे. देश भरातील अनेक प्रमुख राजवंशाचे घराणे कुठल्या ना कुठल्या पक्षात राहून आपले काम करत आहेत. आम्ही ४२ मत देऊन राज्यसभेवर पाठवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यासंदर्भात चर्चा झाली होती. परंतु त्यांच्या समर्थकांनी १५ दिवसांच्या घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत.

संभाजीराजेंनी ऑफर नाकारल्याने संजय पवारांना संधी 

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करावा त्यानंतर त्यांची राज्यसभेवरील उमेदवारीची घोषणा करण्यात येईल असा निरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊतांकडून राजेंना दिला होता. परंतु संभाजीराजेंनी ऑफर नाकारली आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर  ठाम असून आता राज्यसभा उमेदवारी कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना दिली आहे.


हेही वाचा : 2009 साली राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेना अस्पृश्य का?, सेनेचा सवाल

First Published on: May 25, 2022 11:09 AM
Exit mobile version