आम्हाला शब्द वाढवायचा नाही, सहाव्या जागेचा विषय आता संपलाय, संजय राऊतांचं संभाजीराजेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर

आम्हाला शब्द वाढवायचा नाही, सहाव्या जागेचा विषय आता संपलाय, संजय राऊतांचं संभाजीराजेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर

आम्हाला शब्द वाढवायचा नाही, सहाव्या जागेचा विषय आता संपलाय, संजय राऊतांचं संभाजीराजेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर

संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही. राज्यसभेवर जाण्यासाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी देऊ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. पंरतु शिवसैनिकाला उमेदवारी दिली आहे. राज्यसभेवरील जागेचा विषय आमच्यासाठी आता संपला असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान निवडणूक जरी झाली तरी आमची निवडणूक जिंकण्याची क्षमता आहे. राजेंना शिवसेनेत येण्यास सांगितले होते परंतु त्यांनी नकार दिला आहे. त्यांच्यासाठी मतांचीसुद्धा व्यवस्था केली होती असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संभाजीराजे छत्रपती यांच्या आरोपांविषयी प्रश्न करण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, आम्ही तो शब्द ऐकला नाही. पण शिवसेना आपल्या धोरणानुसार वागली आहे. आम्ही आमची सहावी जागा संभाजीराजेंना देऊ केली होती. मतांची व्यवस्था देऊ केली होती. संभाजीराजे छत्रपतींना आम्ही राज्यसभेवर पाठवण्यासाठी प्रस्ताव दिला होता परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही. आमच्यासाठी हा विषय संपला आहे. मी दोन दिवसांपूर्वी सांगितलं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेचा निर्णय आमच्यासाठी संपला आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी आम्हाला प्रेम, आदर, आस्था आहे. आम्हाला शब्दाला शब्द लावून वाद वाढवायचा नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.

राज्यसभेची निवडणूक जरी झाली तरी जिंकण्याची क्षमता महाविकास आघाडी सरकारकडे आहे. सहावी जागा शिवसेनेची आहे. उद्या संभाजीराजेंना राज्यसभेवर जायचे असेल तर तुम्हाला कोणत्यातरी पक्षातूनच जावे लागेल. लोकसभा आणि राज्यसभा लढवायची असेल तरी पक्षातूनच लढावे लागेल असा निर्णय आहे. आम्हाला वाद वाढवायचा नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. शिवसेना भाजप प्रत्येकी दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रत्येकी १ अशा एकूण ६ जागांवर राज्यसभेची निवडणूक होणार आहे. यामध्ये शिवसेनेकडून संभाजीराजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार होती. परंतु त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली होती. संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर नाकारली असल्यामुळे शिवसेनेकडून सहाव्या जागेवर कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. ही माघार नसून स्वाभिमान आहे असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, संभाजीराजेंची माघार

First Published on: May 27, 2022 3:43 PM
Exit mobile version