…त्यांना हे अधिकार कोणी दिले हे माहीत नाही, दीपाली सय्यदना संजय राऊतांचा टोला

…त्यांना हे अधिकार कोणी दिले हे माहीत नाही, दीपाली सय्यदना संजय राऊतांचा टोला

शिवसेनेतून बंड करत 50 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या ट्वीटनंतर या चर्चांना जास्त जोर धरला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.

संजय राऊत नेमके काय म्हणाले –

यावेळी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. पक्षाचे काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही. अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. हे एकत्र होईल का हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी, आमचेच मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही काम केले आहे. तर एकत्र यावे असे का वाटणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

दिपाली संय्यद ट्विटमध्ये काय म्हणाल्या –

येत्या दोन दिवसात आदरणीय उद्धवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खुप बरे वाटले. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुबप्रमुखांची भुमिका मोठ्यामनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्ती करीता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यबाद! चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल, असे ट्विट दिपाली संय्यद यांनी केले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावर टीका  –

मंत्रिमंडळावरुन बोलताना संजय राऊत म्हणाले आमचे मंत्री सात होते, दोघे नव्हते. येथे गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट दोघांमध्ये होत आहे. भाजपमध्ये घटना तज्ञ, कायदे तज्ञ यांची फार मोठी फौज आहे.  त्याची पीसे काढतील. पण यात नैतिकता कुठे आहे.

…त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार लांबला –

जे 40 लोक सोबत गेलेत त्यांच्यावर भरपूर आरोप भाजपनेच केले आहेत. अशा लोकांसोबत मांडीला मांडी लावून कसे बसायचे याबद्दल भाजपला चिंता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे, असा टोली संजय राऊत यांनी लगावला पढे  हे सगळे मंत्री पदासाठी गेलेले लोक आहेत. अनेक लोक मुंबईत येऊन शक्ती प्रदर्शन करत आहेत मंत्री करा असे प्रकार शिवसेनेत कधी झालेले नाही, असे ते म्हणाले.

First Published on: July 17, 2022 11:08 AM
Exit mobile version