पुण्यातील ‘ही’ उद्याने उद्यापासून होणार सुरू; महापालिका आयुक्तांची माहिती

पुण्यातील ‘ही’ उद्याने उद्यापासून होणार सुरू; महापालिका आयुक्तांची माहिती

पुणे सारस बाग

कोरोना व्हायरसचा धोका राज्यभर असताना मुंबईसह पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला असून दोन महिन्यांपासून सर्व दुकानं, उद्यानं बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला होता. मात्र लॉकडाऊन ४ संपल्यानंतर संपुर्ण राज्य हळूहळू पर्वपदावर येताना दिसतंय.

‘ही’ उद्याने उद्यापासून होणार सुरू

दरम्यान पुणे शहरातील जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर दुकानं उघडण्यास परवानगी दिल्यानंतर आता पुणे शहरातील उद्यानं ३ जून पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. यानुसार पुणेकरांसाठी हक्कांची लाडकी असणारी सारसबाग, संभाजी बाग आणि इतर उद्यानं सुरू होणार आहेत.

अत्यावश्यक दुकानं सकाळी ९ ते २ राहणार सुरू

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढलेल्या नव्या आदेशानुसार, ६५ ऐवजी ६६ प्रतिबंधित क्षेत्र झाले असून अनेक विभाग हे कोरोनामुक्त देखील झाले आहे. असे असले तरी कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून सर्व दुकानं सुरू होणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासह खासगी कार्यालयात १० टक्के कर्मचारी उपस्थितीसह ८ जूनपासून ते उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हॉटेल, मॉल, सिनेमागृह, मंदिरं बंदच राहणार

लॉकडाऊनच्या चौथा टप्पा संपल्यानंतर केंद्र शासनाने मंदिर, हॉटेल, मॉल आणि सिनेमागृह उघडतील असे आदेश काढले होते. परंतु राज्य शासनाने काढलेल्या आदेशात हे उघडण्यास परवानगी दिली नसल्याने पुण्यातील हॉटेल, मॉल, सिनेमागृह, मंदिरं बंदच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


Cyclone Nisarga: खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदी लागू
First Published on: June 2, 2020 11:37 PM
Exit mobile version