आंबेघरमधील गावकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

आंबेघरमधील गावकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

आंबेघरमधील गावकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

महाडच्या तळीये गावातील दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत ३८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ नागरिक कालपासून बेपत्ता आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून येथे तातडीने मदत कार्य सुरु करण्यात आले मात्र एनडीआरएफच्या टीमला पोहचण्यास अनेक अडचणी येत आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत सतत वाढत होत असल्याने मदत कार्य वेगाने करण्यास अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे आंबेघरमधील गावकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु आज सकाळी एनडीआरएफच्या टीम आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुन्हा बोटीच्या सहाय्याने आंबेघरमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर कराडमधील प्रिती संगमावरील यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळ अजूनही पाण्याच्या वेढ्यात अडकले आहे. पुणे-बंगलोर महामार्ग वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर २० किमीच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यात आपत्ती व्यवस्थापन आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मार्ग काढून दिला जात आहे. मात्र पंचगंगेची पाण्याची पातळी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत वाहतूक सुरु होणार नाही. पावसाने मध्यरात्रीनंतर उसंती घेतली होती. मात्र पहाटेपासुन पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोयना धरणातून ५३ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून कालपासून त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही.

गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.

कोंडावळे गावातही माळीणसारखी दुर्घटना

यात सातारा जिल्ह्यातील कोंडावळे गावातही माळीणसारखी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवळपास पंचवीस घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. या दुर्घटनेनंतर बिथरलेल्या ग्रामस्थांनी घराबाहेर धाव घेतली. यामुळे अनेक लोकं या मोठ्या दुर्घटनेतून वाचली. या दुर्घटनेत जवळपास २५ घरं गाडली गेली तर २७ लोक बाहेर काढली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.


 

First Published on: July 24, 2021 10:10 AM
Exit mobile version