गोकुळ दूध संघावर सतेज पाटील-हसन मुश्रीफांची सत्ता

गोकुळ दूध संघावर सतेज पाटील-हसन मुश्रीफांची सत्ता

गोकुळ दूध संघावर सतेज पाटील-हसन मुश्रीफांची सत्ता

पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला. या निवडणुकीत गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आघाडीने गोकुळ दूध संघावर एकहाती सत्ता मिळवली. विरोधी पक्षात असलेल्या सतेज पाटील-हसन मुश्रीफांच्या आघाडीने २१ पैकी तब्बल १७ जागा जिंकत सत्ताधारी आघाडीला धोबीपछाड केलं. या निकालाने माजी आमदार महादेवराव महाडिक यांना मोठा धक्का बसला आहे.

महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांची गेली गेली चाळीस वर्षे गोकुळ दूध संघावर सत्ता होती. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह दोन खासदार आणि अनेक आमदार एकत्र आले होते. गेले महिनाभर प्रचाराचा धुरळा उडाला होता. आमचं ठरलं आता फक्त गोकुळ उरलं असं म्हणत विरोधकांनी प्रचाराचं रान उठवलं होतं. रविवारी झालेल्या मतदान झालं. यावेळी ९९ टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं होतं.

मंगळवारी सकाळी कोल्हापुरातील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या दोन-तीन फेरीतच सत्तांतर होणार असं चित्र स्पष्ट झाल्याने निकालातील चुरस संपली. दहा वाजता अंतिम निकाल जाहीर झाला त्यामध्ये सत्ताधारी आघाडीने १७ जागा जिंकल्याचं स्पष्ट झालं विरोधी आघाडीला केवळ चार जागा मिळाल्या. सत्ताधारी आघाडीच्या केवळ शौमिका महाडिक विजयी झाल्या.

 

First Published on: May 5, 2021 10:26 AM
Exit mobile version