Omicron Variant: राज्यात शनिवारी ओमिक्रॉनचे ८ नवे रुग्ण

Omicron Variant:  राज्यात शनिवारी ओमिक्रॉनचे ८ नवे रुग्ण

Omicron : आयसोलेशन बेड्स, अॅम्ब्युलन्सची संख्या वाढवा, केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र, केल्या या सूचना

राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.  राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवारी राज्यात ८ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळावर आढळले आहेत तर ३ रुग्ण साताऱ्या जिल्ह्यातील फलटन तालुक्यातील आहेत आणि १ रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत आढळलेल्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या ४८ वर गेली आहे.

राज्यातील ओमिक्रॉन बाधित ४८ रुग्णांपैकी १८ रुग्ण हे मुंबईतील असून पिंपरी चिंचवड मध्ये १०, पुणे ग्रामीणमध्ये ६, पुणे मनपा येथील ३ रुग्ण आहेत तसेच साताऱ्यातील ३ रुग्ण, कल्याण डोंबिवलीमधील २, उस्मानाबाद मधील २, बुलढाणा नागपूर, लातूर आणि वसई विरारमधील प्रत्येकी १ रुग्ण आहे.  यापैकी २८ रुग्णांना त्यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईचे ४ रुग्ण

मुंबईतील चारही रुग्ण हे विमानतळावर आढळले आहेत. यातील एक रुग्ण मुंबईतील आहे. इतर ३ रुग्ण छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील रहिवासी आहेत. यातील दोघे दक्षिण आफ्रिकेतील असून एकाने टांझानियाचा तर एकाने इंग्लंडचा प्रवास केलेला आहे. या चारही जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाहीत तरिही चौघांना सध्या क्वारंटाइन करण्यात आले आहे.

सातारा येथील ३ रुग्ण 

साताऱ्यात आढळलेल्या ३ रुग्णांनी पूर्व आफ्रिकेचा प्रवास केला होता. एकाच  कुटुंबातील हे सदस्य असून हे सर्वांना लक्षणे नाही परंतु त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यातील ८ वर्षाची मुलगी वगळता इतर दोघांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
पुणे येथील एक रुग्ण हा आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशाचा  संपर्कातील असून १७ वर्षाच्या  मुलीला कोणतीही लक्षणे नाहीत. ती १८ वर्षाखालील असल्याने तिचे लसीकरण झालेले नाही.


हेही वाचा – सातारकरांच्या चिंतेत वाढ! फलटणमध्ये ३ रुग्ण Omicron पॉझिटिव्ह

First Published on: December 18, 2021 8:41 PM
Exit mobile version