सावित्री पूल दुर्घटनेतील बसगाड्यांची दुर्दशा संपेना !

सावित्री पूल दुर्घटनेतील बसगाड्यांची दुर्दशा संपेना !

मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील येथील पुलाला कोसळून दोन वर्षे पूर्ण झाली. नवीन पुल बांधल्यानंतरही तेथील काही समस्या कायम आहेत. दुर्घटनेत सापडलेल्या दोन एसटी बसेस आजही त्या भयाणतेची साक्ष देत आगारात उभ्या आहेत. या बसेस भंगारात काढण्याचा प्रश्न भिजत पडला आहे.

२ ऑगस्ट २०१6 रोजी हा जुना ब्रिटिशकालीन पूल कोसळला. या पुलावरून एस.टी.च्या दोन बसेस आणि एक खासगी बस दुर्घटनाग्रस्त झाली आणि निष्पाप लोकांना आपला प्राण गमवावा लागला. या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. जुन्या पुलांचे ऑडिट करण्यात आले. काही पूल वाहतुकीस बंद करण्यात आले. कोसळलेल्या पुलाशेजारी शासनाने अवघ्या सहा महिन्यात नवा पूल उभा केला. मात्र त्यानंतर त्याची देखभाल वार्‍यावर सोडून दिली.

अपघातानंतर तब्बल ९ महिन्यानंतर, १२ मे रोजी आयोगाने दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी केली. त्यानुसार कोसळलेला पूल नष्ट देखील करण्यात आला. या दुर्घटनेतील दोन एस.टी.बसेस महाड आगारात आणून ठेवण्यात आल्या आहेत. आयोगाची चौकशी झाली, नवा पूल उभा राहिला मात्र या दोन बसेसचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. गेल्या दोन वर्षांत या बसेस पूर्णपणे गंजून गेल्या आहेत. निकाल लागत नसल्याने या बसेस भंगारातदेखील काढण्यात आलेल्या नाहीत.

First Published on: August 2, 2019 1:45 AM
Exit mobile version