एसबीआयचा मोठा निर्णय: बँकेच्या ४४ कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा

एसबीआयचा मोठा निर्णय: बँकेच्या ४४ कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा

SBI Notification 2021: एसबीआयमध्ये ऑफिसर पदासाठी मोठी भरती, ४० हजारांपेक्षा अधिक पगार, असा करा अर्ज

एसबीआय बँकेने सर्व बचत खात्यांसाठी दरमहा किमान शिल्लक रकमेची अट रद्द केली आहे. त्यामुळे बँकेच्या ४४ कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा होणार आहे. भारतीय स्टेट बँकेने बुधवारी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेनं याबाबत निवेदन जाहीर केले आहे. ऐतिहासिक निर्णयामुळे एसबीआयच्या खातेदारांना बचत खात्यात किमान सरासरी शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे बँकेने बचत खात्यात दरमहा किमान शिल्लक रक्कम नसल्यास वसूल केला जाणारा दंड रद्द केला आहे. त्यामुळे ४४ कोटी ५१ लाख बचत खातेदारांना लाभ होणार आहे.

सद्यस्थितीला ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांना क्षेत्रनिहाय बचत खात्यात किमान शिल्लक ठेवावी लागते. खात्यात किमान शिल्लकीच्या कमी रक्कम झाल्यास त्यावर बँक ५ ते १५ रुपये दंड करासह वसूल करते. या निर्णयापूर्वी शहरांसाठी ३ हजार रूपये, निमशहरी भागातील खातेदारांसाठी २ हजार रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा सरासरी एक हजार रुपयांची शिल्लक ठेवण्याची अट होती. मात्र आता बचत खात्यात किमान शिल्लक रकमेचे कोणतेही बंधन ग्राहकांवर नसेल. आता बँकेने ही अट काढून टाकली आहे. भारतीय स्टेट बँकेत तिच्या पाच संलग्न बँका तसेच भारतीय महिला बँक विलीन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाचा व्यापक फायदा होणार आहे.

बचतीचा व्याजदर झाला कमी

‘एसबीआय’ने बचत खात्याचा व्याजदर कमी केला आहे. बचत खात्याचा व्याजदर ०.२५ टक्क्याने कमी करून तो थेट ३ टक्के केला आहे. १ लाख किंवा त्याहून कमी रक्कम असलेल्या बचत खात्यावर आता ग्राहकांना ३ टक्के व्याज मिळेल. यापूर्वी बचत खात्यावर ३.२५ टक्के व्याजदर होता. तर १ लाखांहून अधिक रक्कम असलेल्या खात्यावरील व्याजदर ३ टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

First Published on: March 11, 2020 8:33 PM
Exit mobile version