पुण्यात जमावबंदी पण संचारबंदी नाही – दीपक म्हैसेकर

पुण्यात जमावबंदी पण संचारबंदी नाही – दीपक म्हैसेकर

पुण्यात जमावबंदी पण संचारबंदी नाही - दीपक म्हैसेकर

पुण्यात २४ तासांच्या आत एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या रुग्णांने अबू धाबी आणि टोकिया येथे प्रवास केला होता. त्यामुळे आता पुण्यात १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर २७ रुग्णांची रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आज पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यात जमावबंदी लागू करण्यात येणार असून संचारबंदी लागू होणार नसल्याचं म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच पिंपरी चिंचवड येथे जमावबंदी लागू झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.

आपत्ती निधी देण्यात येणार 

तसंच काल रात्रीत विमानप्रवासातून ९९ प्रवासी आले. त्यापैकी सात प्रवाशांनी स्वच्छेने आपल्याला थोडा त्रास होत असल्याची माहिती दिली. सध्या ते नायडू रुग्णालयात असून डॉक्टरांनी गरज असल्यास त्यांची तपासणी केली जाईल अशी माहिती म्हैसेकर यांनी दिली. सरकारने आपत्ती निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आपत्ती निवारण निधीतून सर्व जिल्ह्यांनी निधी देण्यात येणार आहे. आज संध्यापर्यंत याबाबत आदेश अपेक्षित असल्याचं म्हैसकर म्हणाले.

घरबसल्या काम करण्याच्या सूचना

पुढे दीपक म्हैसेकरांनी मुंबईप्रमाणे पुण्यातील कंपन्यांना घरबसल्या काम करण्याचे आवाहन केलं. तसंच आयटी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याच्या सुचना जारी करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय त्यांनी गृहिणींना आणि नागरिकांना एका आठवड्याचा किराणा घ्या. दुकानावर जास्त गर्दी करू नका आणि दोन ते तीन महिन्यांचा किराणा साठवून ठेवू नका असं आवाहन म्हैसेकरांनी नागरिकांनी केलं.


हेही वाचा – Corona Crisis: ग्रामपंचायत, मनपा निवडणुका पुढे ढकलणार, सर्व शाळा-महाविद्यालये लॉकडाऊन


 

First Published on: March 16, 2020 5:12 PM
Exit mobile version