नागपुरात ७ दिवसांचा लॉकडाऊन; नियमावली जाहीर

नागपुरात ७ दिवसांचा लॉकडाऊन; नियमावली जाहीर

Lockdown:

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अमरावती, नाशिक, पुणे, मुंबई या शहरात देखील कोरोनाच्या आकडेवारीत वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर आता राज्यातील अनेक शहरात लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्याप्रमाणे आता नागपूर शहरात देखील लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागपूर शहरात १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याची घोषणा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.

काय म्हणाले नितीन राऊत?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘मद्यविक्री दुकाने बंद राहणार आहेत. तसेच ऑनलाईन विक्री सुरु ठेवण्यास परवानगी असेल. तर खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहणार आहे. त्याचबरोबर ओळखपत्रे बाळगणेही आवश्यक असणार आहे. त्याचप्रमाणे आता लसीकरण देखील सुरु करणार असून १३१ केंद्रावर लसीकरण करण्यात यावे, अशी आमची योजना आहे. यासाठी सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवक संस्था यांनी देखील आपल्या भागातील लोकांना वाहतूकीची सोय करुन घ्यावी आणि त्यांना लसीकरण केंद्रावर घेऊन जाण्याची आणण्याची सोय करावी’.

नागपूर शहराची नवी नियमावली

First Published on: March 11, 2021 12:59 PM
Exit mobile version