पीओकेमध्ये रक्तपेढीच्या नावाखाली सेक्स रॅकेट; जमात-उत-दावाच्या नेत्याला अटक

पीओकेमध्ये रक्तपेढीच्या नावाखाली सेक्स रॅकेट; जमात-उत-दावाच्या नेत्याला अटक

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जमात-उत-दावा (जेयुडी) चा नेता सैयद समीर बुखारीला सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधून त्याला अटक करण्यात आली आहे. बुखारी हा जेयुडी संबंधित अल-महफिज फाउंडेशन चालवतो. हे फाउंडेशन मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या नेतृत्वातील जमात-उल-दावा या दहशतवादी संघटनेचा भाग आहे.

एएनआयनुसार, एक व्हिडिओ व्हायरल होण्याच्या आधी पोलिसांनी त्याला अटक केली होती. व्हायरल व्हिडिओमध्ये तो बाग स्थित कार्यालयात महिलांसोबत छेडछाड करताना दिसून आला. बुराखी रक्तपेढीच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत होता, हे यातून स्पष्ट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बुखारी हा याआधी जेयुडी प्रमुख हाफिज सईदचा उजवा हात होता. भारत विरोधातील कारवाई आणि हल्ले याकडे जास्त लक्ष देत असून आताही तो हेच काम करतो.

जमात-उत-दावा ही संघटना काश्मीरमधील लोकांसाठी मैत्रीपूर्ण संबंध ठेवते, असे बोलले जाते. परंतु सध्या ही संघटना सेक्स रॅकेट आणि ड्रग सप्लाय करणारी म्हणून ओळखली जाते. स्थानिक पोलिसांनी समीर बुराखीला अटक केल्यावर सेक्स रॅकेटचे प्रकरण जगासमोर आले. सेक्स रॅकेटचा व्यवसाय हा फक्त पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर पुरता मर्यादित नसून पाकिस्तानच्या इतर ही भागात राजरोसपणे सुरू होता.

First Published on: April 23, 2020 5:03 PM
Exit mobile version