शाहीर साबळेंचे जय जय महाराष्ट्र माझा हे ‘राज्यगीत’ होणार, मुनगंटीवारांची माहिती

शाहीर साबळेंचे जय जय महाराष्ट्र माझा हे ‘राज्यगीत’ होणार, मुनगंटीवारांची माहिती

शाहीर साबळे यांचं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ (jay jay maharashtra majha) हे गीत ऐकल्यावर वीरश्री सळसळते. जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (minister sudhir mungantiwar) यांनी दिली. हे गाणं राज्य गीत झाल्यानंतर अधिकृत गाणं असलेल्या देशातील निवडक राज्यांच्या यादीत लवकरच महाराष्ट्रा राज्याचाही समावेश होऊ शकतो असंही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य सरकार राज्याचे अधिकृत राज्य गीत म्हणून अंतिम रूप देण्याच्या तयारीत आहे.

जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत होणार असून. या गाण्यातून महाराष्ट्र राज्य, इतिहास आणि संस्कृती आणि उत्सवांचे कौतुक होईल. या विषयावर चर्चा करण्यासाठी मागील महिन्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिन्दुस्तान टाईम्सला दिली.

सद्यस्थितीत देशातील केवळ 11 राज्यांचेच स्वत:चे असे गाणे आहे. यात आता महराष्ट्र राज्याचेही स्वत:चे गीत असेल. महाराष्ट्राचे अधिकृत राज्य गीत म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याला नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्यता मिळेल असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कवी रादा बढे यांनी लिहिलंय तर श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलंय. कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी या गीताला स्वरसाज चढवला आहे. 2015 मध्ये शाहीर साबळे यांचे निधन झाले. साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष राज्यात साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने हे गाणं प्रदर्शित होणार आहे.

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्यावेळी मुंबईतील दादर येथे शिवाजी पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते.

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत 1.15 ते 1.30 मिनिटांमध्ये बसेल असे या गाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान भारताच्या राष्ट्रगीताची वेळ देखील 52 सेकंद आहे. या गाण्यातील मूळ शब्द बदलले जाणार नाहीत. कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गाणे गायले जाईल असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


हे ही वाचा – 89 हजार एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

First Published on: October 18, 2022 9:25 PM
Exit mobile version