घरमहाराष्ट्र89 हजार एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, राज्य सरकारने घेतला 'हा' निर्णय

89 हजार एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Subscribe

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील 89 हजार अधिकारी आणि कर्मचारी वर्ग याच निर्णयाची मागील अनेक वाट पाहत होते. तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला आहे.

दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. अशातच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी आधी म्हणेजच 21 ऑक्टोबर रोजी देण्याचे आदेश आज राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadanvis) यांनी दिले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बैठक झाली. या बैठकीत 89 हजार एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 45 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा सरकारने केली आहे. एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून हा निधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील 89 हजार अधिकारी आणि कर्मचारी वर्ग याच निर्णयाची मागील अनेक वाट पाहत होते. तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला आहे. दिवाळी भेट म्हणून एसटी महामंडळाला 45 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निधीतून एसटी अधिकाऱ्यांना पाच हजार आणि कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये अशी दिवाळीची रक्कम देण्यात येणार आहे.

- Advertisement -

एसटीच्या 89 हजार कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा लाभ होणार आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 5 हजार रुपये तर कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळं ऐन दिवाळीच्या दिवसात एसटी कर्मचाऱ्यांना महाफगाईच्या काळात थोड्याफार प्रमाणात का होईना पण आर्थिक आधार मिळणार आहे.


हे ही वाचा – साखर निर्यातीसाठी खुले धोरणच सुरू ठेवावे; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींना विनंती

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -