चीनबाबत पंतप्रधानांकडून दिशाभूल, शरद पवारांचा हल्लाबोल

चीनबाबत पंतप्रधानांकडून दिशाभूल, शरद पवारांचा हल्लाबोल

सर्वच राजकीय पक्षांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सुद्धा कामाला लागले असून त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

धर्म ही अफूची गोळी असल्यामुळे आपल्याला सावध राहायला हवं. भारत आणि चीन सीमेवरील पेट्रोलिंग पॉइंटवर चीनने नियंत्रण मिळवलं आहे. आपल्या देशात कोणी घुसलं नाही, असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं. परंतु चीनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर त्यांनी दिल्लीच्या सत्तेला आव्हान दिलं होतं. मराठा सरदारांनी दिल्लीच्या सत्तेला आव्हान दिलं होतं, आज त्याच दिल्लीत आमच्या पक्षाचं अधिवेशन होत आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, चिनी सैन्य घुसले नाही, पण आता त्यांनी चुकीचे वक्तव्य केल्याचे स्पष्ट झाले आहे, असं शरद पवार म्हणाले.

केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविषयी आवाज उचलला पाहिजे. सरकारला आपल्या एकतेची ताकद दाखवली पाहीजे. यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येण्याची गरज आहे. देशात ईडी, सीबीआयचा वापर केला जात आहे. तसेच केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्यामुळे त्याच्याविरोधात लढण्याची तयारी सर्वांनी ठेवली पाहीजे. परंतु देशात नक्कीच परिवर्तन होईल, असं शरद पवार म्हणाले.

शेजारील देशात हुकुमशाहीला जनतेने विरोध केला. काही लोकांच्या हातात सत्ता गेल्यामुळे असे घडले. देशात शेतकऱ्यांवर गाड्या घातल्या, ते योग्य नाही. आपल्या देशात 56 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचा अभिमान आहे, असंही पवार म्हणाले.


हेही वाचा : गणेश विसर्जनावरून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंची खासदार नवनीत राणांवर टीका, म्हणाल्या…


 

First Published on: September 11, 2022 4:48 PM
Exit mobile version