शरद पवार निवडणूक आयोगावर कडाडले, वाजपेयींचा दाखला देत मोदींवरही निशाणा

शरद पवार निवडणूक आयोगावर कडाडले, वाजपेयींचा दाखला देत मोदींवरही निशाणा

संग्रहित छायाचित्र

Sharad Pawar on BJP and Election Commission | पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. सर्वाधिक आमदार-खासदारांची संख्या लक्षात घेता शिवसेनेचा ताबा शिंदे गटाला देण्यात आलाय. या सर्व राजकीय गोंधळात महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची (NCP Leader Sharad Pawar) प्रतिक्रिया आली नव्हती. आता यावर शरद पवारांनी मौन सोडलं असून निवडणूक आयोग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच त्यांनी निशाणा साधला आहे.

हेही वाचा – राष्ट्रपती राजवट कोणाच्या सांगण्यावरून लागली हेसुद्धा पवारांनी सांगावं, फडणवीसांचा घणाघात

पंतप्रधा नरेंद्र मोदी म्हणाले की, “अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशाच्या संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता. नरेंद्र मोदींच्या राजवटीत देशातील संस्थांवर हल्ला झाला. आजचे सरकार इतर राजकीय पक्षांना काम करू देत नाही. निवडणूक आयोगाचा वापर विरोधात केला जात आहे. हा राजकीय पक्षावरचा हल्ला आहे. निवडणूक आयोगाने असा निर्णय कधीच दिला नव्हता. निवडणूक आयोगाचा असा निर्णय पहिल्यांदाच पाहिला.”

शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. त्यांच्या निवडणूक चिन्हावरून वाद निर्माण झाला होता. माझीही काँग्रेसविरोधात पक्षचिन्हावरून लढत सुरू होती. मात्र, तेव्हा निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा – पहाटेच्या शपथविधीचे गुऱ्हाळ आणि पवारांची खेळी

‘सत्तेचा गैरवापर करून एखाद्या पक्षाला व एखाद्या नेतृत्त्वाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळी लोक त्या नेतृत्त्वासोबत उभे राहतात. यापूर्वीही काही पक्षांमध्ये फूट पडली. मात्र, रागाची भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या पक्षाचे नाव व चिन्ह काढून घेण्याचा प्रकार आजपर्यंत झाला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतंय का त्यांना कोणी मार्गदर्शन करतंय हे महत्त्वाचं आहे’, असे शरद पवार म्हणाले.

First Published on: February 22, 2023 7:41 PM
Exit mobile version