शरद पवार म्हणाले, किमान समान कार्यक्रम झाला तर…, महाविकास आघाडीबाबत सूचक वक्तव्य

शरद पवार म्हणाले, किमान समान कार्यक्रम झाला तर…, महाविकास आघाडीबाबत सूचक वक्तव्य

मुंबई – येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. सन २०२४ मधईल लोकसभेची निवडणूक किमान समान कार्यक्रमाच्या आधारे लढण्याचा विचार केला जाऊ शकतो, असं पवार म्हणाले. बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा – नीलम गोऱ्हे सभापती म्हणून स्वत:चे अधिकार वापरतात; पुण्याचे प्रश्न सोडण्यापासून कुणी अडवलंय; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

शरद पवार म्हणाले की, भाजपाने नवा कार्यक्रम हाती घेतला आङे. पैसा, ईडी आणि सीबीआय यांच्या बळावर सरकारे पाडली जात आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात जे घडले तसाच प्रयोग झारखंडमध्येही केला जातोय. भाजपाच्या प्रयत्नांना तोंड कसे द्यायचे हे आम्हाला ठरवावे लागेल. विरोधकांची एकजूट झाली पाहिजे. त्यामुळे आगामी निवडणूक एकत्रित लढण्याबाबत विचार होऊ शकतो, असं शरद पवार म्हणाले.

बिहारमध्ये नितीश कुमारांनी घेतलेल्या निर्णयाचेही शरद पवारांनी स्वागत केले. भाजपाची सथ सोडून राष्ट्रीय जनता दलाबरोबर जाण्याचा निर्णय योग्य असल्याचं पवारांनी सांगितलं.

हेही वाचा – पंतप्रधान मोदी स्वत:च्या खिश्यातून करतात खानपानाचा खर्च; RTI मधून माहिती उघड

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. तसंच, अध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या वादावर  काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. यावर विचारलं पवारांना असता ते म्हणाले की, ‘काँग्रेसचा हा अंतर्गत प्रश्न आहे. याबाबत मी त्रयस्थ आहे.’

First Published on: September 1, 2022 8:40 AM
Exit mobile version