मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलंय, कदाचित वाढत्या वयामुळे लक्षात राहत नसेल; शरद पवारांचा राज्यपालांना टोला

मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलंय, कदाचित वाढत्या वयामुळे लक्षात राहत नसेल; शरद पवारांचा राज्यपालांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीचा राज्य सरकार आग्रह करत नसताना तुम्ही कशाला आग्रह धरता, असं वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) जोरदार टोला हाणला आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलं आहे. कदाचित वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात राहत नसेल, असा टोला शरद पवार यांनी लगावला. आज ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राज्यपालांचे वक्तव्य वाचलं, की त्यांनी कुणाला तरी सांगितलं की सध्याच्या सरकारमधील लोक १२ आमदारांच्या निवडीसाठी आग्रह करत नाहीत मग तुम्ही का करता? माझ्या मते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पत्र यापूर्वी गेलं आहे. कदाचित वाढत्या वयाबरोबर लक्षात आलं नसेल. पण पत्र गेलेलं होतं. अनेकदा गेलेलं होतं. नवाबभाई स्वत: देऊन आले. त्यानंतर मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ देखील गेलं होतं. या गोष्टी करुन देखील याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. त्यावर आता आम्ही प्रतिक्रिया देखील देत नाही. कारण आपल्याकडे म्हण आहे शहाण्यांना शब्दाचा मार…पण शहाण्यांना, असा टोला शरद पवार यांनी राज्यपालांना लगावला.

काय म्हणाले होते राज्यपाल?

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (75th Independence Day) पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते विधानभवन येथे ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. दरम्यान, राज्यपाल मान्यवरांच्या भेटी घेत असताना काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी १२ सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात विचारलं असता अजित पवार माझे मित्र आहेत, सरकार आग्रह धरत नाही, तर तुम्ही का धरता? असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं.


हेही वाचा – १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून आग्रह नाही – राज्यपाल


 

First Published on: August 16, 2021 4:55 PM
Exit mobile version