घरमहाराष्ट्र१२ आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून आग्रह नाही - राज्यपाल

१२ आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून आग्रह नाही – राज्यपाल

Subscribe

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीवर (List of twelve MLAs appointed by the Governor) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (75th Independence Day) पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते विधानभवन येथे ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. दरम्यान, राज्यपाल मान्यवरांच्या भेटी घेत असताना काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी १२ सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात विचारलं असता अजित पवार माझे मित्र आहेत, सरकार आग्रह धरत नाही, तर तुम्ही का धरता? असं म्हणत राज्यपालांनी गुगली टाकला.

राज्यपालांच्या या उत्तरावर खुद्द अजित पवार यांच्या चेहऱ्यावर देखील खोचक हास्य दिसून आलं. दरम्यान, अजित पवार यांनी राज्यपालांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. अजित पवार यांनी हसत हसत आज स्वातंत्र्य दिन आहे, या विषयावर नंतर बोलेन असं म्हणत राज्यपालांनी टाकलेला गुगली अजित पवारांनी सोडून दिला.

- Advertisement -

तथापि, अजित पवार यांनी जरी बोलणं टाळलं असलं तरी खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारवरच निशाणा साधला. बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार आग्रह करत नाही असं राज्यपाल सांगत आहेत. याचा अर्थ आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे तुम्ही काय ते समजून घ्या खोचक टोला बापट यांनी लगावला.

हायकोर्टाची सूचक टिप्पणी

राज्यपाल हे न्यायालयाला बांधील नाहीत, परंतु घटनात्मक जबाबदाऱ्यांचे पालन करणे त्यांचं कर्तव्य आहे. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्यपाल मंत्रिमंडळानं पाठवलेल्या प्रस्तावावर विनाविलंब योग्य तो निर्णय घेतील, अशी आम्हाला आशा आणि विश्वाास आहे. मंत्रिमंडळाने १२ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवून आठ महिन्यांचा काळ उलटला आहे. हा कालावधी पुरेशा कालावधीपेक्षा अधिक आहे. मात्र शिफारस करण्यात आलेल्या सदस्यांची माहिती घेण्यासाठी आणि निष्कर्षाप्रती येण्यासाठी त्यांनी हा वेळ घेतला असावा, असं न्यायालयाला वाटते, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -