अखेर ‘जाणता राजा’ वादावर शरद पवार बोलले…

अखेर ‘जाणता राजा’ वादावर शरद पवार बोलले…

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, या नावाच्या एका पुस्तकावरून सध्या जोरदार वाद सुरू झाला आहे. हे पुस्तक मागे घेतल्यानंतर देखील शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदींची तुलना होऊच कशी शकते? असा आक्षेप घेतला जात असतानाच ‘शरद पवारांना जाणता राजा म्हटलं जातं तेव्हा चालतं का?’ असा उलट आक्षेप देखील घेतला गेला. विरोधी पक्षात असलेल्या भाजपनं याच मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना टोलवायला सुरुवात केली. मात्र, अखेर या सगळ्या वादावर शेवटी खुद्द शरद पवार यांनीच भूमिका मांडली आहे. साताऱ्याच्या माण-खटाव तालुक्यामध्ये झालेल्या सभेमध्ये शरद पवारांनी यासंदर्भात भूमिका मांडली.

‘जाणता राजा’ हा शब्द रामदासांनी आणला!

यावेळी बोलताना शरद पवारांनी समर्थ रामदास स्वामींपासून मुद्दे मांडायला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘मला कळलं कुणीतरी सातारला काहीतरी बोललं. त्यांनी एक वाक्य वापरलं की मला जाणता राजा म्हणतात. मी कुठेही म्हटलो नाही की मला जाणता राजा म्हणा. पण शिवाजी महाराजांचा इतिहास कुणी जर वाचला तर त्यांची उपाधी शिवछत्रपती हीच होती. जाणता राजा नव्हती. जाणता राजा हा शब्द रामदासांनी आणला होता. रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हे जर कुणी म्हणत असतील तर ते खोटं आहे. शिवाजी महाराजांच्या गुरू राजमाता जिजाऊ होत्या. त्यांच्या संस्कारांमध्ये शिवाजी महाराज घडले. त्यांच्या काळात रामदास नव्हते. कुणीतरी काहीतरी लिहिलं आणि त्यावरून आमची लोकं म्हणायला लागली की रामदास त्यांचे गुरु होते. त्यामुळे जाणता राजा हे शिवाजी महाराजांना उपाधी नव्हती. त्यांना छत्रपती हीच उपाधी असायला हवी. त्याव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या उपाधीसाठी आग्रह असता कामा नये’.


हेही वाचा – शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं चालते का?, मुनगंटीवारांचा सवाल
First Published on: January 15, 2020 4:33 PM
Exit mobile version