शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर

शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर

संग्रहित छायाचित्र

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी ते यावेळी करणार आहेत.

काटोलला रवाना

राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार हे आजच नागपूरसाठी रवाना झाले. आज सकाळी नागपूर विमानतळावर दाखल होताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते दोन दिवस नागपूर परिसराचा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विमानतळावरुन ते थेट काटोलला रवाना झाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची ते यावेळी पाहणी करणार आहेत.

First Published on: November 14, 2019 10:40 AM
Exit mobile version