शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तोंडातील अल्सरवर झाली होती शस्त्रक्रिया

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तोंडातील अल्सरवर झाली होती शस्त्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून घरी सोडल्याची माहिती अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयावर मागील महिन्यात शस्त्रक्रिया केल्यानंतर विश्रांतीसाठी घरी सोडण्यात आले होते. यानंतर शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात पुन्हा दाखल झाले होते. यादरम्यान शरद पवार यांच्या तोंडातील अल्सर बळावल्यामुळे या अल्सरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु आता तब्येत ठणठणीत झाल्यावर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढील तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. परंतु त्यांच्या तोंडातील अल्सर बळावल्यामुळे अल्सर संदर्भात आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अल्सर संदर्भातील शस्त्रक्रियेनंतर आता शरद पवार यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती नवाब मलिक यांनी ट्विट करुन दिली आहे.

शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयातील खड्याचा त्रास होत असल्याने २९ तारखेला शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर शरद पवारांना घरी विश्रांती करण्यासाठी रुग्णालयातून सोडण्यात आले होते. परंतु अवघ्या १२ दिवसांच्या अंतरानंतर शरद पवार यांच्या पित्ताशायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असल्याची माहिती नवाब मलिक यांनी वेळोवेळी दिली होती.

शरद पवार यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांच्या तोंडातील अल्सर बळावला असल्यामुळे या तोंडातील अल्सरवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मागील ३ दिवसांपूर्वी शरद पवारांच्या तोंडातील अल्सरवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शरद पवार यांची तब्येत ठणठणीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

First Published on: April 28, 2021 7:30 PM
Exit mobile version