“जातात त्यांच्याबद्दल चिंता नको…”, शरद पवारांची भगीरथ भालकेंच्या बीआरएस प्रवेशावर प्रतिक्रिया

“जातात त्यांच्याबद्दल चिंता नको…”, शरद पवारांची भगीरथ भालकेंच्या बीआरएस प्रवेशावर प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपुरचे नेते हे भगीरथ भालके हे लवकरच BRS पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपुरचे नेते हे भगीरथ भालके हे लवकरच BRS पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भातील हालचालींना आता वेग आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पंढरपूर मतदारसंघात मोठा फटक बसण्याची शक्यता आहे. पण याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी अत्यंत शांत पद्धतीने उत्तर देत याबाबत चिंता व्यक्त करण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरू; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

औरंगाबाद येथून आज (ता. 07 जून) शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भगीरथ भालके यांच्या बीआरएस प्रवेशावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, साधारणतः कोण पक्षातून जातय याचा आढावा घेतल्यानंतर त्याबाबत फारशी चिंता व्यक्त करण्याची गरज नाही. वर्ष सहा महिने जाऊ द्या. अनुभव घेतल्यानंतर लोक निष्कर्षाला येतील. संबंध देश मोकळा आहे. त्यामुळे चंद्रशेखर राव यांनी कुठेही जावं. त्यांना विरोध असण्याचं कारण नाही. त्यांनी जे पैशाचं शेतकऱ्यांना वाटप केलं. त्याचा अर्थकारणावर परिणाम काय होईल ते दिसेल. सरकारचा पैसा वाटण्यासाठी घालवायचा किंवा वाटप करण्यावर घालायचा हे पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्याकडून देण्यात आलेली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या प्रवेशानंतर उमेदवारीसंदर्भात भाष्य करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसकडून घाई झाल्याचे आता बोलण्यात येत आहे. कारण, पोटनिवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेणारे भालके हे राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे आणि त्यांची नाराजी आता उघडपणे दिसून येऊ लागली आहे.

गेल्या काही महिन्यात बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपल्या पक्षाचे पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेते हे त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा करण्यात येत आहे. आज सकाळी पुण्याच्या विमानतळावरून भगीरथ भालके हे हैद्राबादच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पंढरपूरात राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे. पण शरद पवारांची याबाबतची प्रतिक्रियी ऐकल्यानंतर तरी त्यांना भगीरथ भालके यांच्या राष्ट्रवादी सोडल्याने काहीही फरक पडणार नसल्याचेच दिसून येत आहे.

यावेळी शरद पवार यांनी विषयांवर भाष्य केले. देशात सध्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा विषय सर्वाधिक गाजलेला आहे. याबाबत शरद पवार यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, आम्ही लोकांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. अनेकांनी पाठिंबा दिला आहे. बृजभूषण सिंह शरण हे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्याविरोधात सरकार किती खोलात आहे हे पाहावं लागेल. त्यांची चौकशी सुरू झाली आहे. मात्र, कुस्तीगिरांचं म्हणणं आहे की त्यांना अटक करा. पण निदान चौकशी सुरू केली आहे. अशी माहिती मिळाली असल्याचे शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

First Published on: June 7, 2023 10:28 AM
Exit mobile version