घरनवी मुंबईनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Subscribe

नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाहणी दौरा केला. यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरू असल्याची माहिती दिली. (Work on Navi Mumbai International Airport started at a very fast pace; Information given by the Deputy Chief Minister)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व याठिकाणी आलो आहोत. पहिल्यांदा या विमानतळाचा सर्व आवाका लक्षात यावा म्हणून हेलिक़ॉप्टरने या साईटची पाहणी केली. त्यानंतर जो रनवे बनतो आहे त्याची आणि टर्मिनल बिल्डींगची पाहणी केली. त्यानंतर या विमानतळासंदर्भात प्रेजेटेक्शन आमच्या समोर करण्यात आले. या विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. खरं म्हणजे देशातील अतिशय युनिक अशाप्रकारचे हे विमानतळ आहे. 2017 साली या विमानतळाचे काम सुरू करण्यात आले असून 2024 पर्यंत हे विमानतळ ऑपरेशनल होईल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने अजून त्याला गती देण्यात यावी आणि त्यात काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यात याव्यात, हा खरा हेतू मुख्यमंत्र्यांचा दौऱ्याचा आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -

या विमानतळाला ट्रान्स हर्बर लिंकमुळे कनेटीव्हिटी मिळणार आहे. कोस्टल रोड, मेट्रो आणि विविध ट्रान्सपोर्टस्टेशनचे मॉडेल या विमानतळाला जोडण्यात येणार आहेत. 9 कोटी प्रवाशी या विमानतळावरून प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे मला असे वाटते की, मुंबईला एक अत्यंत चांगली भेट या विमानतळाच्या माध्यमातून मिळणार आहे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वसतीगृहातील घटना दुर्देवी
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कालची घटना दुर्देवी आहे. पिडीत मुलगी वसतीगृहात राहत होती आणि त्याच ठिकाणी तिचा मृतदेह आढळला आहे. संशय असा आहे की, शारिरीक शोषण झाला असल्याची शक्यता आहे आणि पोस्टमार्टमनंतर ते समजेलच. त्यामुळे त्याबद्दल स्पष्टपणे सांगता येणार नाही. पण अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला आहे, हे मात्र नक्की. तिथल्या सर्व परिस्थितीजन्य पुराव्यानुसार तिथल्याच सुरक्षा रक्षकाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न अयशस्वी झाला किंवा अन्य काही कारणाने त्याने आत्महत्या केल्याचे निर्देशनात येत आहे. याच्या पाठीमागे अजून काही कारण आहे का याची चौकशी पोलीस करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, यासंदर्भात पोलीस आज दुपारी किंवा पुढील दोन दिवसात पत्रकार परिषद करतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -