स्त्रियांच्या चारित्र्यावर टीका करून शांत करण्याची तुमची पद्धत, शीतल म्हात्रेंचा आव्हाडांवर पलटवार

स्त्रियांच्या चारित्र्यावर टीका करून शांत करण्याची तुमची पद्धत, शीतल म्हात्रेंचा आव्हाडांवर पलटवार

मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे या चर्चेत आहेत. शीतल म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात पोस्टरवॉर सुरू आहे. शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक मालेगावातील फोटो ट्वीट केला होता. यावेळी मालेगावात उद्धव ठाकरेंना उर्दूत शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावरून म्हात्रे आणि आव्हाड यांच्यात पोस्टरवार सुरू झाले. दरम्यान, स्त्रियांच्या चारित्र्यावर टीका करून शांत करण्याची तुमची पद्धत, अशा प्रकारचं ट्विट करत शीतल म्हात्रे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर पलटवार केला आहे.

काय आहे शीतल म्हात्रेंचं ट्वीट?

स्त्रियांच्या चारित्र्यावर टिपण्णी करुन शांत करण्याची तुमची पद्धत ही सगळ्यांनाच माहिती आहे आव्हाडजी… बंद दाराआडच्या गोष्टीही सगळ्यांना माहिती आहे… टिपण्णी करताना आव्हाडजी विसरू नका लेक तुमच्या घरातही आहे… बाकी निवडणुकीत धूर दाखवू…, असं ट्वीट करत शीतल म्हात्रे यांनी आव्हाडांवर निशाणा साधला.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला होता. मालेगावात उद्धव ठाकरेंना उर्दूत शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले होते. हीच का तुमची हिंदुत्त्ववादी विचारधारा? असा सवाल म्हात्रेंनी यावेळी विचारला.

शीतल म्हात्रेंच्या याच ट्वीटला उत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उर्दू भाषेतील बॅनर प्रसिद्ध केला. दुसऱ्यांवर ढकलायची तुमची सवय आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी शीतल म्हात्रेंना डिवचलं. एवढंच नव्हे तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी उर्दूत लिहिलेली गझलही त्यांनी पोस्ट केली.

मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणा-या जितेंद्र आव्हाडांना ट्विट चांगलाच झोंबलेलं दिसतयं. पण मला एक समजत नाही मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

या ट्वीटमुळे त्यांच्यातील ट्वीरवॉर आणखी पेटला. “मला काम करताना गवगावा करण्याची सवय नाही … लोकांसाठी कार्यक्रम करतो .. माझ्या मतदार संघात येऊन विचारा …. उघड्यावर लाज घालवणारे कृत्य मी करत नाही …. आठवतेना काय ते ढुं..ण काय तो दांडा… धूर कुठुन निघाला,” असं आव्हाड म्हणाले.


हेही वाचा : उगाच बोलायला लावू नका…, जितेंद्र आव्हाड आणि शीतल म्हात्रे यांच्यात ट्वीटरवॉर


 

First Published on: March 27, 2023 4:04 PM
Exit mobile version