Shikhar Bank Scam : आर्थिक गुन्हे शाखेचा अजित पवारांसह रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना दिलासा

Shikhar Bank Scam : आर्थिक गुन्हे शाखेचा अजित पवारांसह रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना दिलासा

मुंबई पोलिसांचा अजित पवारांसह रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना दिलासा

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या – शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आता मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांना देखील क्लीन चिट मिळाली आहे. (Shikhar Bank scam case Relief Ajit Pawar Rohit Pawar Sunetra Pawar of Financial Offenses Branch)

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आता पवार कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला असून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या – शिखर बँकेत कोणताही घोटाळा झाला नसल्याचा या रिपोर्टमधून दावा करण्यात आला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी कथित संबंध असलेल्या व्यवहारांमध्ये कोणताही फौजदारी गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले आहे. बँकेला कोणताही आर्थिक नुकसान झालं नसून आत्ता पर्यंत 1343.41 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचे क्लोजर रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : भाजपा नेते धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा, म्हणाले…

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याचा निष्कर्ष आधीच काढल होता. त्यामुळे या कथित घोटाळा प्रकरणात त्यांना आधीच दिलासा मिळाला होता. तर जानेवारी महिन्यात या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. परंतु, त्यातील तपशीलाची माहिती आता उघड करण्यात आली आहे. ज्यामुळे या रिपोर्टमध्ये अजित पवारांशी संबंधित व्यवहारांमध्य कोणत्याही फौजदारी गुन्ह्याची नोंद नसल्याचेही सांगितले आहे.

काय होते प्रकरण?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या – शिखर बँकेकडून सहकारी साखर कारखाने, सुतगिरण्या आणि राज्यातील इतर सहकारी संस्थांना हजारो कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. त्यामध्ये घोटाळा झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर सहकार आयुक्तांनी शिखर बँकेची चौकशी करण्याकरिता माजी न्यायाधीशांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती देखील केली होती. परंतु, मुंबई आर्थिक शाखेने या प्रकरणी नव्याने तपास केल्यानंतर या प्रकरणात कोणतीही अनियमतता नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ज्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, यांच्यासह आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे यांना क्लीन चीट मिळाली आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : हिंदू-मुस्लिम दंगल घडू शकते म्हणून माघार घेतली; त्या घटनेवर बच्चू कडूंचे स्पष्टीकरण


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 24, 2024 11:22 AM
Exit mobile version