घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रLok Sabha 2024 : भाजपा नेते धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा, म्हणाले...

Lok Sabha 2024 : भाजपा नेते धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा, म्हणाले…

Subscribe

कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा नेते धनंजय महाडिक आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यामधील शाब्दिक वाद वाढला आहे.

कोल्हापूर : महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे कोल्हापुरचे राजे छत्रपती शाहू महाराज हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात संजय मंडलिक यांना पुन्हा महायुतीकडून शिवसेना शिंदे गटान उमेदवारी दिली आहे. ज्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मविआने तर छत्रपतींना विजयी करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. पण दुसरीकडे मात्र, भाजपाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यामधील शाब्दिक वाद वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. (Lok Sabha Election 2024 BJP leader Dhananjay Mahadik warning to Satej Patil)

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी “रात्री बारा वाजता काठी घेऊन येऊ या…” असे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा आता खासदार धनंजय महाडिक यांनी समाचार घेतला आहे. सतेज पाटील यांना कोल्हापुरात दंगल घडवायची आहे का?, असा प्रश्न करत महाडिक यांनी पाटलांवर निशाणा साधत म्हटले की, सतेज पाटील विसरलेत की ते गृहमंत्री नाहीत. आता त्यांनी सांभाळून बोलले पाहिजे. आता आमचे सरकार आहे. ते गृहमंत्री नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी जाहीर वक्तव्य करू नयेत, असा सल्लाच महाडिकांकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : हिंदू-मुस्लिम दंगल घडू शकते म्हणून माघार घेतली; त्या घटनेवर बच्चू कडूंचे स्पष्टीकरण

तर, लोकशाहीमध्ये सर्वच प्रचार करत असतात. ते काठीची भाषा वापरतात. कारण कदाचित त्यांना दंगल घडवायची असावी. त्यांचा तो नेहमीचा फॉर्मुला आहे. आपल्या हातातून यशनिष्ठ असेल तर अशा पद्धतीने एखादा स्टंट करायचा आणि लोकांचा अट्रॅक्शन मिळवायचे. गृहमंत्री असताना ते सोडणार नाही…, उचलून आणतो…, ही भाषा वापरायचे. कोल्हापुरकरांना माहिती आहे ते घाबरलेले आहेत. या आधी सुद्धा बिंदू चौकमध्ये त्यांनी अंमल महाडिक यांना आव्हान दिले होते ते आले नाहीत. कोणीही भाजपा कार्यकर्ता त्यांच्या आडवे जाण्याचा प्रश्नच नाही, असे धनंजय महाडिक यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

सतेज पाटील यांना निवडणुकीचा निकाल लक्षात आलेला आहे. निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ते वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसत आहेत. त्यांचा उमेदवारी संदर्भातला जो प्लॅन होता. तो फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याचे दिसत आहे. शाहू महाराजांबद्दल आदर आहे, पण महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. कोणी कोणाच्या आडवं जायचे कारण नाही. कारण ही लोकशाही आहे. सतेज पाटील वक्तव्य करत आहे की आमच्या आडवे येऊ नका. त्यामुळे कोण कोणाच्या आडवे जात आहे?, असा प्रश्नही भाजपा नेते महाडिक यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे. ज्यामुळे आता महाडिकांच्या या वक्तव्याला काँग्रेस नेते सतेज पाटील काय उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : गृहमंत्री अमित शहांनीच कायदा तोडला, त्यांनी…; बच्चू कडूंचा हल्लाबोल


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -