शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांच्या मेळाव्याला हजारोंची गर्दी; पण शौचालये अवघी ५० – ७०च्या घरात

शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांच्या मेळाव्याला हजारोंची गर्दी; पण शौचालये अवघी ५० – ७०च्या घरात

मुंबई -: बुधवारी दसरा सण आहे. सर्व हिंदू बांधवांसाठी दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा. याच दिवशी बीकेसी येथे शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा होणार आहे तर दुसरीकडे शिवाजी पार्क येथे शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या दोन्ही मेळाव्यांना किमान ६० हजार ते एक लाख किंवा त्यापेक्षाही जास्त शिवसैनिकांचा जनसागर गर्दी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी बीकेसी येथे फक्त ५० शौचालये तर शिवाजी पार्क येथे फक्त ७० शौचलयांची व्यवस्था मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येला उपलब्ध शौचालये अपुरे पडण्याची दाट शक्यत वर्तवली जात आहे.

शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी ७० फिरती शौचालयलयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, सार्वजनिक स्वच्छता आणि वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, बीकेसी येथे मैदाने, ५० फिरती शौचालये, सार्वजनिक स्वच्छता आणि वाहनांच्या पार्किंगची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, शिवाजी पार्क येथे मैदानावर वाढलेले गवत छाटण्यात आले आहे. तसेच, मैदानात जमिनीवर रोडरोलर फिरवून सपाटीकरण करण्यात आले आहे.

दादर ते शिवाजी पार्क मैदानात विविध ठिकाणी एकूण सुमारे ७० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ठिकठिकाणी आयोजकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच, मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी सेनापती बापट मार्ग, मृदुंगाचार्य मैदान, रेती बंदर, कामगार स्टेडियम येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या दसरा मेळाव्यासाठी बीकेसी येथील परिसरात किमान ५० व त्यापेक्षा अधिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, पिण्याच्या जेवण व पाण्याची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. तर या मेळाव्याला येणाऱ्या वाहनांसाठी कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या संकुलात चित्रनगरी मैदान, नॅनो सायन्स येथील मोकळया जागेत पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

… तर अनामत रक्कम जप्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी येथील आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील मेळाव्याला रात्री १० पर्यंतच परवानगी असणार आहे. जर नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांची जमा अनामत रक्कम जप्त करण्यात येणार आहे. तसेच, मेळाव्यानंतर मैदान पूर्ववत करून देण्याची जबाबदारी आयोजकांची असणार आहे.


शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या 10 वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळल


First Published on: October 4, 2022 9:52 PM
Exit mobile version