राज्यात शिवसेनेची ओळख एकनाथ शिंदेनी निर्माण केली; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

राज्यात शिवसेनेची ओळख एकनाथ शिंदेनी निर्माण केली; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना या कार्यक्राचे व्हॉट्सअॅपवर आमंत्रण मिळाल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतित्युत्तर दिले आहे. तर विरोधकांनी उद्घाटनाचा राजकीय डावपेच खेळला आहे, असा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे.

‘विश्वासघातकी कोणाला म्हणातात, ज्याच्यावर विश्वास टाकला असेल आणि त्यांनी त्या विश्वासाचा भंग केला असले तर त्याला विश्वास घातकी असे म्हणतात’, असा टोला शिदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी सामना दिलेल्या मुलाखतीत शिंदे गटाला विश्वासघातकी असे म्हटले होते. तसेच, “राज्यात शिवसेनेची ओळख कोणी निर्माण केली, ९० टक्के सामजिक आणि १० टक्के राजकीय अशी ओळख एकनाथ शिंदे यांनी निर्माण केली”, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले.

“ज्या माणसाने तुमच्यासाठी त्याचे संपूर्ण आयुष्य सार्थकी लावले आहे, अशा माणसाला तुम्ही विश्वासघातकी का म्हणतात. तुमचे मुख्यमंत्री पदही त्यांना नको होते. शिवाय आम्ही ४० ते ५० आमदारांनी तुम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबतची आघाडी तोडा असे सांगितले होते. त्यानंतर आम्ही परत येतो, असेही म्हटले होते. मग तुम्ही आघाडी का तोडली नाही. एकतर्फी बोलू नका ज्यामुळे गैरसमज होतील. आसाममध्ये असताना आम्ही सतत बोलत होतो. आम्ही एकदा कुठेही कमिटमेंट केली, आमची कुठेही आघाडी युती झाली तर तो दोन पक्षांचा प्रश्न आहे. तोपर्यंयत तुम्ही आम्हाला सांगा आम्ही परत यायल तयार आहोत”, असे शिदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले.

भाजपाच्या अनेक नेत्यांवर आरोप

“आता तुम्ही म्हणतात की राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस चांगली आहे, तर मी सांगीन की, भाजपाही योग्य आहे. भाजपाच्या नेत्यांन काय केले याबाबत ही सांगीन. भाजपाच्या अनेक नेत्यांवर आरोप करण्यात आले आहेत. भाजपा आणि शिवसेनेची युती आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या समोर वास्तुस्थिती समोर आली पाहिजे. पण तुम्ही बोलत असाल की, मातोश्रीवर आरोप केले आणि आमदारांनी काहीच म्हटले नाही, तर ते योग्य नाही. यामध्ये प्रत्येकाचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे असे बोलणे चुकीचे आहे”, असेही केसरकर यांनी म्हटले.

“तुम्ही म्हणतात की राजीनामे द्या आणि निवडून या, मग २०१९ च्या निवडणुकीवेळी तुम्ही राजीनामे देऊन, निवडून येऊन पुन्हा सरकार का नाही स्थापन केले, असा सावाल केसरकरांनी विचारला. आम्ही शांत राहतो म्हणजे काही बोलणार नाही असे नाही, आम्हाला तुमचा आदर आहे, म्हणून आम्ही काहीच बोलत नाही. परंतु, तुम्ही एकनाथ शिंदे यांना विश्वास घातकी म्हणतात, याचा एकदा विचार करा, राज्यात शिवसेनेची ओळख कोणी निर्माण केली, ९० टक्के सामजिक आणि १० टक्के राजकीय अशी ओळख एकनाथ शिंदे यांनी निर्माण केली”, असे दीपक केसरकर यांनी म्हटले

“कोरोना महामारीच्या काळात दोनदा एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली. परंतु, त्यावेळी सर्वात जास्त मदत आणि सगळ्यात जास्त काम हे एकनाथ शिंदे यांनी केले”, असेही त्यांनी म्हटले.


हेही वाचा – दिल्लीत वाऱ्या अन् फुटीरांमधील मतभेद, या व्यापात सरकारला ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यास वेळ नाही : जयंत पाटील

First Published on: July 28, 2022 5:02 PM
Exit mobile version