आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही बापूंच्या ‘काय झाडी.. काय डोंगर..’ डायलॉगची पडली भुरळ

आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही बापूंच्या ‘काय झाडी.. काय डोंगर..’ डायलॉगची पडली भुरळ

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांसह शनिवारी आसाममधील गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आणि आमदार आणि काही खासदार राज्यातील सत्तासंघर्ष काळात 11 दिवस गुवाहाटीमध्ये होते. त्यानंतर महाराष्ट्रात येत त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. यावेळी शिंदे समर्थक आमदार शाहाजीबापू पाटील यांचा काय झाडी.. काय डोंगर.. काय हॉटेल.. हा डायलॉग तुफान गाजला. यावरून अनेक मिम्स, गाणी, व्हिडीओ व्हायरल झाली. अशात महाराष्ट्रात सत्ता स्थापन होताच मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच आपल्या समर्थक आमदार, खासदारांसह पुन्हा गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. मात्र बापूंच्या या डायलॉगची भुरळ आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी पडली आहे.

शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार खासदार महाराष्ट्र व्हाया सुरत ते गुवाहाटीला पोहचले. यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील देखील ठाकरे गटातून गुवाहाटीतील शिंदे गटात सामील झाले,   गुवाहाटीला असताना शहाजी बापू पाटील यांनी सांगोल्यातून एक फोन आला ज्याचे रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल झाले. यातील शहाजी बापू पाटलांचा ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं एकदम ओक्के’ हा डायलॉग प्रचंड प्रसिद्ध झाला. इतकंच नाही तर या डायलॉगवर गाणी देखील बनली. शहाजी बापू पाटील जिथं जातील तिथं हा डायलॉग म्हणण्याची त्यांना विनंती केली जाते आहे.

शहाजीबापू पाटील यांच्या काय झाडी.. काय डोंगर.. काय हॉटेल.. या वाक्याची महती सरमा यांचाही कानावर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वेळी आलेली होती. मात्र या भेटीचे निमित्त साधून आमदार शहाजीबापू पाटील यांनी खुद्द आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनाही त्यांचा हा डायलॉग खास आपल्या शैलीत ऐकवला..तो न समजल्यामुळे पुन्हा इंग्रजीमध्ये समजावून देखील सांगितला.

या डायलॉग त्यावेळी चांगलाच लोकप्रिय झाल्यामुळे त्याची प्रचंड चर्चा झाली होती, एवढंच नव्हे तर हा डायलॉगमुळे महाराष्ट्रातून गुवाहाटीमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या देखील प्रचंड वाढली होती.

यावेळी राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, समन्वयक आशिष कुलकर्णी, आसाम मंत्रिमंडळातील मंत्री केशव महंत, मंत्री चंद्रमोहन पतवाडी, मंत्री उरखाऊ गोडा ब्रम्हा, मंत्री रंजित कुमार दास, मंत्री डॉ रनुज पेगो, आसाम सरकारचे शिक्षण सल्लागार नानी गोपाल महंता, मंत्री जयंता मलना बरुआ तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी उभारले जाणार आसाम भवन; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती

First Published on: November 27, 2022 1:01 PM
Exit mobile version