शिर्डी रविवारपासून बेमुदत बंद, २५ गावांचा पाठिंबा

शिर्डी रविवारपासून बेमुदत बंद, २५ गावांचा पाठिंबा

साईबाबा यांचे जन्मस्थळ कोणते यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे आणि या वादावरुन आता शिर्डी येथील ग्रामस्थांकडून रविवारपासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. रविवारपासून होणाऱ्या या बंदमध्ये शिर्डीतील सर्व दुकाने, हॉटेल्स बंद राहणार आहेत. मात्र, असे असले तरी मंदिर सुरुच राहणार आहे. पण बंदमुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रामस्थांची बैठक घेणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे.

दरम्यान, रविवारपासून बंद होणाऱ्या शिर्डीमध्ये व्यवसाय देखील ठप्प राहणार आहेत. मात्र, साईदर्शन, भक्तनिवास आणि प्रसादालय सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या विकास आराखड्याचे काम केले असून लवकरच भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आता वर्षानंतरची डेडलाईन


First Published on: January 18, 2020 2:41 PM
Exit mobile version