shiv jayanti 2022 : पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना मानवंदना; शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

shiv jayanti 2022 : पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना मानवंदना; शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

shiv jayanti 2022 : पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना मानवंदना; शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारकडून शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला आहे. या भव्य सोहळ्यात अनेक शिवप्रेमींनी उपस्थिती दर्शवली आहे. दरम्यान यानंतर पोलीस पथकाकडूनही छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. याशिवाय महाराष्ट्रातील पारंपारिक वाद्य ढोल-ताशा आणि लेझीमची प्रात्यक्षिके दाखवत राजांना मानवंदना अर्पण करण्यात आली आहे. त्यामुळे शिवनेरी गडावर मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या सोहळ्यानिमित्त शिवनेरी गड आकर्षक रांगोळ्या आणि फुलांनी सजवण्यात आला आहे. संपूर्ण परिसर जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे. राज्यभरात आज शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत असून शिवजयंतीचा एक उत्साह पाहायला मिळतोय.

दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवरायांना वंदन करतानाचा एक फोटा पोस्ट करत त्यांना अभिवादन केले आहे.

दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्लावर अनेक शिवप्रेमी जमत असतात, राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्लावर येतात. मात्र कोरोनामुळे सर्व खबरदारी घेत यंदाही काही मोजक्या लोकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवजयंतीचा उत्साह

शिवजयंतीच्या सोहळ्या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्कातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत हे उपस्थित होते.


Shiv Jayanti 2022 : औरंगाबादच्या क्रांती चौकात शिवरायांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण


 

First Published on: February 19, 2022 10:17 AM
Exit mobile version