राज्यपालांनी पत्र लिहिण्याची जबाबदारी दुसऱ्या राजकीय नेत्याकडे दिली का? राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

राज्यपालांनी पत्र लिहिण्याची जबाबदारी दुसऱ्या राजकीय नेत्याकडे दिली का? राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी फारचं सक्रिय होते. तेव्हा तेच राज्यकर्ते होते, तेच निर्णय घेत होते, आदेश देत होते. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी पत्र लिहायचं विसरले आहेत का? पत्र लिहायची ती जबाबदारी त्यांनी अन्य कोणत्या पक्षाच्या राजकीय नेत्यावर दिलेय का, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

शिवसेना संपवण्याचं भाजपचं स्वप्न

गिरीश महाजनांनी जे विधानावरून स्पष्ट झालं की, भाजपची भूमिका सरकार पाडण्यामागची भूमिका काय होती. भाजपचं हे जुन स्वप्न होतं. शरद पवारांमुळे शिवसेना फुटली असं काल कोणतरी म्हणत होतं. आज गिरीश महाजन स्पष्ट बोलले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. जे पोटात सत्य होतं ते होठावर आलं. त्यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहे. मात्र महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्या आड शिवसेना येऊ शकते म्हणून आधी शिवसेनेचे तुकडे करा हे भाजपाचं राष्ट्रीय धोरण आहे ते त्यांनी अशाप्रकारे अंमलात आणले. हे आमच्या खोकेबहाद्दर 40 आमदारांना कळालं नाही आणि ते महाराष्ट्राच्या बेईमानीच्या कटात सामील झालेत, म्हणत राऊतांनी शिंदे – फडणवीस सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडली.

एसीबीने आमच्याकडे बघण्यासाठी वेगळा चष्मा लावला आहे का?

मविआमधील नेत्यांविरोधात होत असलेल्या कारवाईविरोधात राऊत म्हणाले की, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख यांना एका एसीबीची नोटीस आली. आम्ही ईडीच्या चक्रातून, न्यायालयातून बाहेर पडलो, अशी आमची अनेक लोकं आहेत ज्यांच्यावर तपास यंत्रणेच्या तलवारी मारल्या जातायत, लटकत ठेवल्या आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भ्रष्ट्राचार, आर्थिक गैरव्यवहार, घोटाळ्याची जी प्रकरणं काढली ती एसीबीला दिसत नाहीत का? एसीबीने आमच्याकडे बघण्यासाठी वेगळा चष्मा लावला आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

उद्या आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराल

सरकारमधील आमदार, मंत्र्यांचे कोट्यावधीचे घोटाळे बाहेर काढले मात्र आमच्यावर दबाव आणण्यासाठी अशाप्रकारे चौकश्या केल्या. कल्याणमधील आमच्या पक्षाचे नेते, प्रमुख पदाधिकारी विजय सावळी यांच्यावर फक्त राजकीय आंदोलनाचे गुन्हे आहेत. रस्ता रोको, घेराव घालणं असे गुन्हे दाखल आहेत, त्यांना तडीपारीचे नोटीस दिली, अशा तडीपाऱ्या सुरु आहे. उद्या आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराल कारण देशात काहीही होऊ शकतं, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.


आज महाराष्ट्र देशातील सर्वात असुरक्षित राज्य; संजय राऊतांचं मोठं विधान

First Published on: January 10, 2023 11:52 AM
Exit mobile version