मातोश्री पेजवरुन ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, मास्टर माईंडलाही अटक करावी, शीतल म्हात्रेंची मागणी

मातोश्री पेजवरुन ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, मास्टर माईंडलाही अटक करावी, शीतल म्हात्रेंची मागणी

शिवसेना आशीर्वाद यात्रेतील शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ फॉरवर्ड करून व्हायरल केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, ‘ठाकरे गटाच्या लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला. मातोश्री या पेजवर तासाभरात ३०० जणांनी तो व्हिडिओ शेअर केला. ठाकरे गटाच्या पेजने हा व्हिडिओ शेअर केला’, असेही शीतल म्हात्रे यांनी सांगितले. (Shiv sena leader Sheetal Mhatre Talk On Viral Video)

व्हायरल व्हिडीओप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मातोश्री या फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचे सांगितले. ‘एक स्त्री म्हणून आज खूप वेदना होताहेत. कारण एक सुशिक्षित पत्रकार होती. पण आवडीमुळे राजकारण आली. राजकारणात काही वेगळे करून दाखवण्यासाठी राजकारणात आली. स्वत:चे अस्तित्व निर्माण करायला लागली. वेळेप्रसंगी अग्निदिव्य करावी लागली. बऱ्याचदा जिवावर बेतलं. परंतु, आत्मसन्मान वाचवण्यासाठी सर्वकाही केले’, असे शीतर म्हात्रे म्हणाल्या.

‘कालांनतराने बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही गेलो. परंतु, त्यानंतर आम्हा महिलांना अतिशय वाईट पद्धतीने बोलणे सुरू झाले. मागील 8 ते 9 महिने अनेक ट्रोलींगचा सामना करत आहोत. सोशल मीडियावर आमच्यावर वाईट पद्धतीने बोलले जात असून कमेंटही केल्या जात आहेत. तरीही आम्ही टीकाकारांना उत्तर न देता सातत्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. कामाकडे लक्ष देत महाराष्ट्राच्या जनतेला कशाप्रकारे प्रगतीपथावर न्यावे यासाठी प्रयत्न करत होतो’, असेही शीतल म्हात्रे म्हणाल्या.

‘शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागाठाणे येथे प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमानिमित्त आले होते. त्याठिकाणी एक व्हिडीओ काडून त्यावर व्हायात पद्धतीचे गाणे टाकून अतिशय वाईट पद्धतीचे मेसेज टाकून मातोश्री या फेसबुक पेजवर व्हायरल करण्यात आले. ठाकरे गटाच्या लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला. मातोश्री या पेजवर तासाभरात ३०० जणांनी तो व्हिडिओ शेअर केला. ठाकरे गटाच्या पेजने हा व्हिडिओ शेअर केला’, असेही शीतल म्हात्रे म्हणाल्या.

‘एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानंतर माझ्यावर खालच्या भाषेत टीका आणि ट्रोलिंग सुरु करण्यात आले आहे. जो पकडल्या गेला आहे तो, ठाकरे गटाचा शाखा प्रमुख आहे. पायाखालची वाळू सरकल्यानंतर असे व्हिडिओ शेअर केले जात आहे. बाळासाहेबांचे संस्कार विसरले. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणारे त्यांची शिकवण विसरले आहेत’, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या.

‘या मागचा मास्टर माईंड कोण त्याचाही शोध घेतला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीच्या अँगलने फोटो किंवा व्हिडिओ तयार करणं दुर्दैवी आहे. हे महाराष्ट्रात घडतं आहे, याचं दुःख होत आहे. प्रकाश सुर्वे हे आजारी आहेत. त्यांना घशाचा त्रास होत आहे ते बोलू शकत नाही. त्यामुळे ते सोबत नाहीत. मात्र त्यांचा मुलगा माझ्या सोबत आहे. त्यानेही तक्रार दाखल केली आहे’, असेही शीतल म्हात्रे म्हणाल्या.

‘राजकीय लढाई ही विचारांची असली पाहिजे. मातोश्री हे उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत पेज आहे. त्यावरुन हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. मातोश्री वर बसून हा व्हिडिओ व्हायरल करण्याचे आदेश दिले जात होते. तत्त्वांचा, विचारांचा विरोध असावा. ठाकरे गटातील महिलांनीही या घटनेचा निषेध केला पाहिजे’, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या.


हेही वाचा – जुन्या 500, 1000 नोटांच्या ‘त्या’ पोस्टबद्दल पीआयबीचे स्पष्टीकरण; म्हणाले…

First Published on: March 12, 2023 7:07 PM
Exit mobile version