महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेला मोठा धक्का, पक्षनेतृत्वावर आरोप करत बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री

महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेला मोठा धक्का, पक्षनेतृत्वावर आरोप करत बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री

महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेला मोठा धक्का, पक्षनेतृत्वावर आरोप करत बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री

राज्यातील महानगरपालिका निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विदर्भात शिवसेनेला गेल्या २ महिन्यांमध्ये दुसरा फटका बसला आहे. शिवसेनेच्या बड्या नेत्यानं पक्षनेतृत्वार गंभीर आरोप करत भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात असल्यामुळे जुन्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आणि नाराजी पसरली आहे. या नाराजीमुळे शिवसेनेतील निष्ठावंत आणि बडे नेते शिवसेनेला रामराम करत आहेत. शिवसेना नेते व विदर्भाचे सहसंपर्कप्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवबंधन सोडून भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे याचा शिवसेनेला आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा फटका बसू शकतो.

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गड असलेल्या विदर्भात शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. मागील महिन्यात अशोक शिंदे यांनी शिवबंधन सोडून काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याचं डॅमेज कंट्रोल होण्यापुर्वीच शिवसेनेचे विदर्भ सहसंपर्कप्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेतून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका निवडणुक तोंडावर आल्यामुळे सावरबांधे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनाला धोका निर्माण होऊ शकतो. विदर्भात शिवसेनेची ताकद कमी आहे अशात नागपूर महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत शिवसेना बॅकफूटवर जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना सहसंपर्कप्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवसेना पक्षनेतृत्वार नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेत बाहेरुन येणाऱ्यांना संधी देण्यात येतेय मात्र कित्येक वर्ष शिवसेनेत असल्यांना डावललं जात आहे. मी २० वर्षांपासून शिवसेनेत राहिलो पण शिवसेनेत यापुढं राहणं शक्य नाही असा आरोप करत सारवबांधे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. शेखर सावरबांधे हे शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांचे निकटवर्तीय मानले जातात, नागपूरचे माजी उपमहापौर आहेत. सावरबांधे यांची शिवसेनेवर विदर्भात चांगली पकड होती मात्र गजानन किर्तीकर यांच्या शब्दाला मान नसल्यामुळे त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा : जन आशीर्वाद यात्रेचा फटका बसणार, नारायण राणेंच्या टीकेला अजितदादांचे प्रत्युत्तर


 

First Published on: August 29, 2021 2:56 PM
Exit mobile version