हिंदुत्वाच्या मुद्यावरून राऊतांचा मनसेला अप्रत्यक्ष टोला

हिंदुत्वाच्या मुद्यावरून राऊतांचा मनसेला अप्रत्यक्ष टोला

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला आता काही लोकांना पालवी फुटली आहे, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेला लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे कोणत्याही पदावर नव्हते, परंतु जगतज्जेत्या अलेक्झांडरप्रमाणे ते वावरले. लोकांना संघटीत केले, लढण्याची प्रेरणा दिली. आजही जी शिवसेना आहे, ती त्यांच्याच मार्गावर जात आहे. तसेच त्यांनी आजतागायत हिंदुत्वाची ज्योत प्रखरतेने तेवत ठेवली आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर हिंदुहृदयसम्राट म्हणून बाळासाहेब आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

याशिवाय प्रखर हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी रुजवला, जो विचार अभिप्रेत होता. बाकी सगळे आता ठीक आहे मात्र काही लोकांना पालवी फुटली आहे, ती फुटू द्या. पण, बाळासाहेब आणि शिवसेना यांना तोड नाही. म्हणून फक्त २३ जानेवारीला नाही तर महाराष्ट्रात आणि देशात बाळासाहेबांचे स्मरण रोज होत असते, असे संजय राऊत यांनी सांगितले.

राज्य सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. तसेच मुख्यमंत्र्यांचा हा अयोध्या दौरा पंढरपुरच्या वारीसारखा आहे. वारीमध्ये ज्याप्रमाणे जात, धर्मभेद नसतो त्याप्रमाणेच हा दौरा आहे. तर यावेळेस महाविकास आघाडीतील नेत्यांनीही मुख्यमंत्र्यासोबत अयोध्येला यावे, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतं नाही – एकनाथ खडसे


 

First Published on: January 23, 2020 5:35 PM
Exit mobile version