शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार

सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार नाही असे भाजपने घोषित केल्यानंतर आता शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, शिव-महाआघाडीचे सरकार बनेल असे खात्रीलायक सूत्रांकडून समजत असून, 12 नोव्हेंबरला यावर अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला असून, मुख्यमंत्री पाच वर्षे शिवसेनेचा असेल तर उपमुख्यमंत्री पद हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अडीच अडीच वर्षे असेल असे या फॉर्म्युल्यामध्ये ठरले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला 20 मंत्रीपदे तर शिवसेनेला 20 मंत्रीपदे असा फॉर्म्युला देखील ठरल्याचे समजत आहे.

केंद्रातूनही सेना सरकारमधून बाहेर पडणार?
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना केंद्रातून देखील बाहेर पडणार असून, आज याचसाठी अरविंद सावंत यांना मढला बोलावण्यात आले होते. अरविंद सावंत देखील केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत, असे देखील सांगण्यात येत आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीकडे महत्त्वाची खाती?
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री, गृहमंत्री ही दोन्हीपदे शिवसेना स्वतःकडे ठेवणार असून, कृषिमंत्री पद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याचे ठरल्याचे देखील समजत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेकडून मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, यावर शिक्कामोर्तब देखील झाले आहे. खुद्द आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांनी यामध्ये पुढाकार घेतला असून रश्मी यांची इच्छा आहे की आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत.

शिवसेना-५६
राष्ट्रवादी -५४
काँग्रेस-४४

असा असले दुसरा फॉर्म्युला
संख्याबळानुसार, राज्यात ३८ ते ४० मंत्री होऊ शकतात. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये अजून एक फॉर्म्युल्यावर खल होत आहे. त्यानुसार, शिवसेनेला-१२, राष्ट्रवादी काँग्रेस-१२ तर काँग्रेसलाही १२ मंत्रीपदे मिळू शकतात. सलग ५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहिल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा एक उपमुख्यमंत्री असेल. गृहखाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहिल.

First Published on: November 11, 2019 7:05 AM
Exit mobile version