पुतळ्याची उंची घटली तरी तलवारीची पात उसळती ठेवू – CM

पुतळ्याची उंची घटली तरी तलवारीची पात उसळती ठेवू – CM

shivaji maharaj statue (File Photo)

छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामध्ये उभारण्यात येणारं स्मारक, मागील काही काळापासून चर्चेत आहे. शिवाजी महाराजांचं हे स्मारक जगातील सर्वात उंच स्मारक असून, गेल्या काही दिवसांपासून पुतळ्याच्या उंचीवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जगातलं सर्वात उंच स्मारक बांधण्यासाठी खर्चही तितकाच उच्चकोटीचा लागणार यात वाद नाही. अतिरितक्त खर्चामुळे सरकारला महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करावी लागण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र, नाईलाजामुळे घ्याव्या लागलेल्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक नामी शक्कल शोधून काढली आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार फडणवीस यांनी स्मारकाची उंची ठरलीये तितकीच ठेवून, तलवारीच्या पातीची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयावर सध्या अंतिम चर्चा सुरु असल्याचं समजत आहे.

उंचीच्या वादात सापडलं स्मारक

राज्य सरकारने आराखड्यामध्ये केलेल्या नवीन बदलांनुसार, महाराजांच्या या पुतळ्याची उंची ७.५ मीटरने कमी करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे त्यांच्या हातात असलेल्या तलवारीची उंची वाढवण्यात येणार आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणारा महाराजांचा हा पुतळा, अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा असणार आहे. इतकंच नाही तर चीनमध्ये तयार होत असलेल्या बुद्धांच्या पुतळ्यापेक्षाही हा पुतळा मोठा असेल. महाराजांचं हे स्मारक याआधी नेहमीच उंचीच्या आणि खर्चाच्या मुद्द्यावरून चर्चेत राहिलं आहे. सरकारच्या आधीच्या आराखड्यानुसार सुरुवातीला या पुतळ्याची उंची ८३.२ मीटर तर त्यांच्या हातातील तलवार ३८ मीटर इतकी निश्चित करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पासाठी येणारा अव्वाच्या सव्वा खर्च लक्षात घेता ही उंची आता ७५.५ मीटर आणि तलवारीची उंची ४५.५ मीटर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवीन आराखड्याप्रमाणे या पुतळ्याची उंचा १२१.१ मीटर इतकी असणार आहे.

दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार या स्मारकासाठी लागणारा एकूण खर्च पूर्वीपेक्षा आता ३३८.९४ कोटी रुपयांनी कमी झाला आहे. एल अँड टी कंपनीला हे स्मारक बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं असून, येत्या ३ वर्षांत ते बांधून पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

First Published on: July 17, 2018 11:30 AM
Exit mobile version