राज्यपालांनी राजकीय दबावापोटी सरकारची अडवणूक करणं चुकीचे- संजय राऊत

राज्यपालांनी राजकीय दबावापोटी सरकारची अडवणूक करणं चुकीचे- संजय राऊत

महाराष्ट्र सरकारच्या वतीने काही राज्यपालांना दिलेल्या फाईलबाबत मंत्री बोलत आहेत. फाईल काय आहे कधी पाठवली याबाबत काही सांगू शकत नाही. लोकनियुक्त सरकार ज्या सरकारने घटनेनुसार शपथ घेतली आहे. ती शपथ राज्यपालांनी दिली आहे. त्या सरकारची राजकीय कारणामुळे अडवणूक करु नये असा इशारा शिवसेने नेते संजय राऊत यांनी दिला आहे. विधानपरिषद सदस्यांची नियुक्ती एमपीएससी नियुक्ती अशा प्रकारची अडवणूक हाराजकीय दबावाचा प्रकार असतो त्यांचे बोलवते धनी वेगळे असतात राज्यापालांनी असे करु नये. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये हा प्रकार घडत आहे. याबाबत राज्यातील मंत्री बोलतील असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असते सरकारचे पाय खेचण्यासाठी नसते, जर महाराष्ट्र सरकारचे पाय खेचायचा प्रयत्न केला तर तुमचा पाय अडकेल असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

“राज्यपाल प्रशासकीय गोष्टीमध्ये हस्तक्षेफ करत आहेत. त्यांना कोणी हस्तक्षेप करायला सांगत आहेत का हे पाहायला लागेल. जी काम राज्य सरकारची आहेत. त्या कामात घुसण्याचा प्रयत्न होत आहे. हे सर्वस्वी घटनाविरोधी आहे. राज्यपालाना कामाचा आढावा घेण्याचा अधिका आहे. परंतू गावठिकाणी दौरे करण्याची गरज नाही. भाजप शासित राज्यातील राज्यपाल अशा प्रकारे दौरे करत नाहीत. हे समजून घेतले पाहिजे यानंतर समजेल की पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील राज्यपाल का असे वागत आहेत. राज्यपालांचे काम त्यांनी केले पाहिजे राज्यपालांचे काम मर्यादित स्वरुपातलं आहे. मंत्रिमंडळाचे निर्णय पाळावे आणि दुसरे काम यामध्ये घटनेतील शिष्टाचार पाळावे आणि घटनेनुसार नियम पाळले तर बरं पडेल” असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एमपीएससीच्या सदस्यांची यादी उशीरा मिळाली असेल असे त्यांचे म्हणणे असेल तर १२ सदस्यांच्या यादीचं काय झाले या यादीला तर ९ महिने झाले आहेत. यावर उत्तर राज्यपालांनी दिलं पाहिजे असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

विमा कंपन्यांबाबत अर्थमंत्र्यांची भेट

विमा संदर्भात भूमिका घेतली आहे. घरं गाड्या वाहून गेले आहेत. नागरिकांचे कागदपत्र वाहून गेले आहेत. अशा वेळेस केंद्राने विमा कंपन्यांना सूचना द्याव्यात अशी विनंती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना दिलं आहे.

काँग्रेससोबतचा हातातला हात खांद्यावर

शिवसेना नेते संजय राऊत यांना राहुल गांधी यांच्या बाजूला बसल्यावरुन आणि खांद्यावर हात ठेवल्याच्या प्रकाराबद्दल प्रश्न केला असता संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, सध्या महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहोत. तो हात खांद्यावर आला इतकच झाल आहे. आमचे चांगले संबंध आहेत. एकत्र राज्य चालवताना, सरकार चालवताना फक्त पक्ष जवळ येऊन चालत नाही मनंही जवळ यावे लागतात, त्याच दृष्टीने पावलं पडत असतील तर त्याचे लोकं स्वागतच करतील असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच बाजूच्या खुर्चीवर बसल्यावरुन संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेला नेहमीच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये मानाचे स्थान दिलं जातं, राहुल गांधी यांच्याशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निरोप दिले गांधींना दिले आहेत. राहुल गांधी राज्य सरकारच्या कामाबाबत समाधानी आहेत.

First Published on: August 4, 2021 10:00 AM
Exit mobile version